व्हिडिओ संदर्भात आणखीन महत्व ची माहिती:
१.ह्या झाडाखाली १००% पाण्याचा झरा असतो, जमिनीतील पाणी कसे शोधावे,पानाडी,how to find underground water
२. जाग्यावर ३ इंची पाणी काढून देणार,जमिनीतील पाणी कसे शोधावे,How To Find Underground Water,ground water Tital
३.आसच बघा पाणी १००% पाणी लागेल || जमिनीतील पाणी कसे शोधावे || पानाडी || To Find Underground Water
अजून एक पद्धत आहे निश्चित ही पद्धत सुद्धा अनुभवू शकता:
४.जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी कसे पाहावे पाण्याचा शोध #agrowone भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे.
५)या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात.
६)प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत.
७)दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. ८)फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो.
९) ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो.
१०)जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्चित होते.
११)जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे. अजून काही माहिती:-
१२) वाळवंटी प्रदेशातील भूगर्भांतर्गत जलशिरा उंटाच्या पाठीसारख्याच वाकड्या असतात. त्या सरळ वाहत नाहीत, तसेच त्या फार खोलीवर असून थोड्या पाण्याच्या व मध्ये खंडित झालेल्या असतात.
१३)ज्या वाळवंटी प्रदेशात भूगर्भात जलशिरा आहेत, त्या ठिकाणी भूपृष्ठावर खालील लक्षणे दिसतात ः - पिलू वृक्षाच्या ईशान्येला एखादे वारूळ असेल, तर पश्चिम दिशेला साडेचार हातावर पाच पुरुष खोलीवर पाणी सापडते. १४)खोदताना एकेक पुरुष खोलीवर एक बेडूक, नंतर तपकिरी माती, त्याखाली हिरवट रंगाची माती व त्याखाली पाणी मिळते.
१५)पिलू वृक्षाच्या पूर्वेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हातावर सात पुरुष खोलीवर पाणी मिळते.
१६)पहिल्या चार हातावर एक काळा व एक पांढरा, हातभर लांब सर्प दिसतो.
१७)त्याच्या दक्षिणेला क्षारयुक्त पाण्याची मोठी शीर दिसते.
१८) - करीर वृक्षाच्या उत्तरेला वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेला साडेचार हात अंतरावर दहा पुरुष खोलीवर पाणी मिळते. खोदताना पाच हातांवर पिवळा बेडूक सापडतो. - रोहितक वृक्षाच्या पश्चिमेला वारूळ असल्यास त्याच्या दक्षिणेला तीन हातांवर व बारा पुरुष खोलीवर खाऱ्या पाण्याचा पश्चिमाभिमुख भूजलस्रोत असतो. - सुवर्णक झाडाच्या उत्तरेला वारूळ असेल, तर त्याच्या दक्षिणेला दोन हातांवर पंधरा पुरुष खोलीवर क्षारयुक्त जलवाहिनी आढळते. खोदताना अडीच हातावर मुंगूस, नंतर तांब्याच्या रंगाचा दगड, नंतर लाल माती व शेवटी दक्षिणवाहिनी जलशिरा मिळते. - रोहित वृक्ष व बोरीचे झाड जवळ असून त्यांच्यामध्ये वारूळ असेल तर त्यांच्या पश्चिमेला तीन हात अंतरावर सोळा पुरुष खोलीवर गोड्या पाण्याची जलशिरा मिळते. प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर उत्तरवाहिनी होणारी ही जलशिरा असते. खोदताना पिठासारखा पांढरा दगड, नंतर पांढरी माती व अडीच हातांवर विंचू लागतो. - अश्मन्तक वृक्षाच्या उत्तरेला बोरीचे झाड, वारूळ असेल तर उत्तरेला सहा हातांवर व साडेसतरा हात खोलीवर पाणी मिळते. खणताना पाच हातावर एक कासव, नंतर निळा दगड, वाळूयुक्त माती नंतर एक दक्षिणवाहिनी जलशिरा व त्यानंतर ईशान्यवाहिनी जलशिरा मिळते. - दारू हळदीच्या झाडाच्या वारूळ असेल तर पूर्वेला तीन हातांवर खणल्यास पावणे एकोणतीस हातावर पाणी लागते. खणताना प्रथम पाच हातांवर निळा साप, नंतर पिवळी माती, नंतर पाचूच्या रंगाचा दगड, पुढे काळी माती व तिच्याखाली एक पश्चिमाभिमुख व नंतर दक्षिणाभिमुख जलशिरा सापडते. - एखाद्या निर्जल प्रदेशात विशिष्ट ठिकाणी दूर्वा किंवा विरळ गवताचा भाग आढळला तर त्याखाली पाच हातांवर पाणी मिळते. - एका प्रकारचे वांगे, त्रिवृता, दंती, सूकरपादी लक्ष्मणा (वेलवर्गीय काटेरी) आणि नवमालिका (जुई) या वनस्पती या वेली जर एखाद्या भागात आढळल्या, तर त्यांच्या दक्षिणेला दोन हातांवर व पंधरा हात खोलीवर पाणी मिळते. - एखाद्या भागातील वृक्षांची पाने जर मऊ व चकाकणारी असली, फांद्या लांबवर पसरून लोंबत असल्या तर त्या भागातील भूगर्भात पाण्याचा साठा असतो. - याउलट रुक्ष व निस्तेज पाने, वाळल्यासारखे दिसणारे खोड अशी वृक्षांची स्थिती असेल तर त्या भागात पाणी नाही, असे समजावे. - तिलक, अंबाडी, वरुण, भल्लातक, बिल्व, तिन्दुक, अंकोल, पिंडार, शिरीष, अंजन, परुषक, वंजुल (अशोक) आणि अतिबला या वनस्पतींची पाने स्निग्ध व तेजस्वी असली आणि आजूबाजूला वारूळ असेल तर तेथे उत्तरेला तीन हातांवर साडेबावीस हात खोलीवर पाण्याचा साठा असतो. #agrowone #agrowone_marathi #जमिनीतीलपाणीकसेपाहायचे #Agrowonemarathi #पाण्याचाशोधकसाघ्यावा #पाणीकसेशोधावे #जमिनीतीलपाणीकसेशोधावे #पाणी #पाणाडी #पानाडी
#पाणीशोधणे #पाणी
#पानाडीव्हिडिओ
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
Информация по комментариям в разработке