धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️

Описание к видео धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️

धानवली - कड्याखाली वसलेले महाराष्ट्राच्या, पुणे जिल्ह्याच्या, भोर तालुक्यातील महादेव-कोळी लोकांचे आदिवासी गाव.

सह्याद्रीच्या डोंगररांगात, कडेकपाऱ्यांत सुमारे ५०० वर्षांपासुन स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवत, समृद्ध वारसा जपत, निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या या महादेव कोळी लोकांचा खरोखर अभिमान वाटतो.

या महादेव-कोळी समाजाने थेट शिवकाळापासुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, मग ते शिवरायांसोबत स्वराज्य कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभाग राहिलेला आहे.

या समाजातील लोकांना निसर्गाचे अगाध ज्ञान असते तसेच रानवाटा या देखील तंतोतंत माहीत असतात, त्यामुळे आजदेखील यांचे या दऱ्याखोऱ्यांत राहणे हे सामान्य ट्रेकर मंडळींसाठी एकप्रकारे वरदानच आहे कारण या ट्रेकर मंडळींना हर एकप्रकारे या लोकांची मदत होत असते.


आज या व्हिडीओ मार्फत आपण याच महादेव-कोळी समाजातील आदिवासी लोकांचा जीवनप्रवास जवळून पाहणार आहोत, अनुभवणार आहोत.

संपुर्ण व्लॅाग नक्की पहा तसेच आवडल्यास व्हिडीओ शेअर करा व चॅनल ला लाईक आणि सबस्कारइब नक्की करा..😊🙏🏼🚩



#रायरेश्वर #raireshwar #rayreshwar

Комментарии

Информация по комментариям в разработке