Bhaskar Patil Khatgaonkar यांचा Congress प्रवेश, Ashok Chavan यांनी Nanded मधला होल्ड गमावलाय का ?

Описание к видео Bhaskar Patil Khatgaonkar यांचा Congress प्रवेश, Ashok Chavan यांनी Nanded मधला होल्ड गमावलाय का ?

#BolBhidu #AshokChavan #Nanded

लोकसभा निवडणुकीच्या बरोबर दोन महीने आधी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कॉँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजपमध्ये जाण्याने कॉँग्रेसला नांदेडमध्ये मोठं नुकसान होईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. नुसतं नांदेडमध्येच नाही तर मराठवाड्यातील लोकसभेच्या चार ते पाच जागांवर अशोक चव्हाण कॉँग्रेसचं नुकसान करतील असं बोललं गेलं. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा 59 हजार मतांनी पराभव झाला. खरं तर हा पराभव प्रताप पाटील चिखलीकरांपेक्षा वैयक्तिक अशोक चव्हाणांचा होता. आता विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना अशोक चव्हाणांचे अनेक कार्यकर्ते आणि नेते परत एकदा कॉँग्रेसचा रस्ता धरत आहेत.

यातील प्रमुख नाव आहे भास्कर पाटील खतगावकर यांचे. भास्कर पाटील खतगावकर हे अशोक चव्हाणांचे मेहुणे आहेत. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर ते सुद्धा भाजपमध्ये गेले होते..पण विधानसभेच्या तोंडावर ते पुन्हा स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतले. भास्कर पाटील खतगावकरांच्या या कॉँग्रेस वापसीने आता अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर नांदेडमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. अगदी दहा वर्षापूर्वी नांदेडमध्ये एकहाती वर्चस्व असणाऱ्या अशोक चव्हाणांनी नांदेडमधला आपला होल्ड कसा गमावला,नांदेडमध्ये त्यांचं काहीच चालत नाहीये का ? अशोक चव्हणांचं साम्राज्य कसं उद्धवस्त झालं, त्याची कारण काय ? पाहूया आजच्या व्हिडिओतून



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке