नागपंचमी साठी पातोळ्या | Patolya For Nagpanchami |

Описание к видео नागपंचमी साठी पातोळ्या | Patolya For Nagpanchami |

साहित्य :-
१ नारळ , पाव किलो गुळ , तुप , वेलची पावडर , ड्रायफ्रूड , हळदीची पाने , तांदळाच पीठ , मीठ , पाणी .

कृती :-
१. प्रथम चुलीवर भांड ठेवणे , त्यात २ चमचे तुप टाकणे.
२. तुप गरम झाल्यानंतर त्यात खिसलेला ओला खोबरा टाकणे.
३. गुळ घालुन ५ मिनिटे शिजवुन घेणे.
४. चवीनुसार १ चमचा वेलची पावडर व ड्रायफ्रूड टाकणे.
५. एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करत ठेवणे, त्यात पाणी व मीठ टाकणे.
६. पाणी गरम झाल्यानंतर २ वाटी तांदळाच पीठ टाकणे, व्यवस्थित पीठ एकत्र करून घेणे.
७. २ मिनिटे पीठ शिजवून घेणे.
८. पीठ व्यवस्थित मळुन घेणे.
९. हळदीच्या पानांमध्ये पीठ व तयार मिश्रण घेवुन पातोळ्या तयार करून घेणे.
१०. चुलीवर एका भांड्यात २ ग्लास पाणी करत ठेवणे, पाणी गरम झाल्यावर तयार पातोळ्या १५ मिनिटे शिजवत ठेवणे.
११. तयार आहेत पातोळ्या.
.
.
.
.
.

#patolya #dessert #nagpanchami #naivadya #maharashtrian #redsoilstories
#maharashtrianfood #maharashtriancuisine #marathi #marathifood #foodlover #recipevideo #recipeoftheday #recipes #foodstagram #foodporn #food #instareels #reelsinstagram #reelsvideo #reels #reelsindia #reelsviral

Комментарии

Информация по комментариям в разработке