मल्हारगड | Malhargad | Sonori Fort

Описание к видео मल्हारगड | Malhargad | Sonori Fort

Malhargad is a hill fort located 30 kilometers (19 miles) from Pune, near Saswad in western India. It is also called Sonori Fort because the village of Sonori is situated at its base. The fort is named after the deity Malhari and was the last fort built by the Marathas in 1775.
पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीवराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो.
पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी. वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке