Jai Malokar MNS : मनसे आणि मिटकरींच्या राड्यानंतर जय मालोकरचा मृत्यू झाला पण पोस्टमार्टमने खळबळ का ?

Описание к видео Jai Malokar MNS : मनसे आणि मिटकरींच्या राड्यानंतर जय मालोकरचा मृत्यू झाला पण पोस्टमार्टमने खळबळ का ?

#BolBhidu #JayMalokarMNSCase #MNSVsAmolMikari

30 जुलैचा दिवस मनसे विरुद्ध अमोल मिटकरी राड्यानं चांगलाच गाजला होता. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यांनी फ्लोवर ब्लॉक आणि कुंड्या फेकून गाडीच्या काचा फोडल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी गाडीत अमोल मिटकरी नसल्यानं सुदैवानं यातून ते बचावले. पण या हल्ल्यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी आलेला मनसैनिक जय मालोकर याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण आता जवळपास ५० दिवसांनी जय मालोकर याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय. यात जयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नव्हे तर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलंय.

shock due to multiple injuries to vital organs असं डॉक्टरांनी मृत्यूचं कारण दिलंय. पोर्स्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. जय मालोकरसोबत घातपात घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? संशय काय व्यक्त केला जातोय? या सगळ्यावर अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिलीय? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке