Time । Future and Past । Raju Parulekar मला लतादीदींचा फार हेवा वाटतो

Описание к видео Time । Future and Past । Raju Parulekar मला लतादीदींचा फार हेवा वाटतो

आपल्या अवतीभोवती असलेल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या वेळेबाबत आपली काही निरीक्षणं असतात. भूतलावरील एकही माणूस असा नाही जो हे निरीक्षण करत नाही. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी याच विषयाला 'मनातलं'च्या या भागात हात घातला आहे. जेव्हा तुम्ही त्रासात असता, दुख भोगता तेव्हा तुम्हाला वेळेचं महत्व कळतं असं सांगताना राजू परुळेकर यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं. मनाला चटका लावून जाणारा हा प्रसंग असून या प्रसंगानंतर आपल्याला वेळेचं महत्व कळालं असं परुळेकर यांनी म्हटलंय. प्रचंड निर्मितीक्षम माणसं ही काटेकोरपणे वेळ पाळतात आणि ती हजारो वर्ष टीकेल असं समृद्ध काहीतरी तुम्हाला देऊन जातात असं परुळेकर यांनी अधोरेखित केलं आहे.

राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Комментарии

Информация по комментариям в разработке