सोयाबीन तणनाशक प्लस कीटकनाशक | सोयाबीन तणनाशक + कीटकनाशक फवारणी | soybean tannashak + kitaknashak |

Описание к видео सोयाबीन तणनाशक प्लस कीटकनाशक | सोयाबीन तणनाशक + कीटकनाशक फवारणी | soybean tannashak + kitaknashak |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
सोयाबीन पीक हे २० -२२ दिवसाचे झाले आहे, अश्यात पिकामध्ये तणांचे प्रमाण जास्त आणि कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. तर आपण कीटकनाशक आणि तणनाशक एकत्रित रित्या आपण फवारणी करू शकतो का ? नक्कीच करू शकतो काही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आपण फवारणी करू शकतो, यामध्ये हवामान, औषधाची मात्रा, फवारणीची वेळ, आणि पाण्याचा पीएच खूप महत्वाचा आहे, त्यानुसारच आपण फवारणी करू शकतो.
टीप :- जे प्रमाण दिले जात आहे, त्यानुसारच आपण फवारणी करू शकता, यामध्ये कोणतेही औषध याव्यतिरिक्त मिसळायचे नाही.


जर प्लॉट मध्ये तण आणि रस-शोषक किडी असतील तर

१) परिमेज़ ( इमाज़ेथिपर) @४०० मिली + इकालक्स ( क्विनॉलफॉस २५%इ सी) @ ५०० मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी
२) साकुरा (क्विज़ालोफॉप इथाइल १०% ईसी)@४०० मिली + इकालक्स ( क्विनॉलफॉस २५%इ सी) @ ५०० मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी

जर प्लॉट मध्ये अळीचा प्रादुर्भाव असेल तर

१) परिमेज़ ( इमाज़ेथिपर) @४०० मिली + इंडोक्सा (इंडोक्साकार्ब १४.५ एससी) @१२० मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी
२) साकुरा (क्विज़ालोफॉप इथाइल 10% ईसी)@४०० मिली + इंडोक्सा (इंडोक्साकार्ब १४.५ एससी) @१२० मिली मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी

जर प्लॉट मध्ये अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर

१) परिमेज़ ( इमाज़ेथिपर) @४०० मिली + कोराजन (क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५ %) @ ४० मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी
२) साकुरा (क्विज़ालोफॉप इथाइल 10% ईसी)@४०० मिली + कोराजन (क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५ %) @ ४० मिली प्रति १५० लिटर पाणी नुसार एक एकर साठी फवारणी

हि फवारणी घेताना आपण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत
१) कडक उन्हामध्ये फवारणी घेयची नाही
२) पावसामधे फवारणी घेऊ नये
३) वारा चालू असताना फवारणी घेऊ नये
४) जे प्रमाण दिले जात आहे, त्यानुसारच आपण फवारणी करू शकता
५) या व्यतिरिक्त कोणतेही दुसरे औषध मिश्रण करू नका.
६) फवारणी मध्ये चिलेटेड झिंक @२०० ग्राम प्रति १५० लिटर पाण्यासाठी आपण वापर करू शकता. म्हणजे झटका बसणार नाही
७) फवारणी नंतर पिकाची वाढ जर खुंटली असेल तर आपण विपुल बूस्टर ( ट्रायकाँटॅनॉल ०.१%) @ २ मिली + सागरिका (समुद्री शेवाळी अर्क २८%) @२ मिली नुसार आपण फवारणी करू शकता.


व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.

काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

Комментарии

Информация по комментариям в разработке