नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, "माइंड रिदम कंटेंट डेव्हलपर्स" "कुसुमाग्रजांची कविता" हा आगळावेगळा दृकश्राव्य काव्याविष्कार सादर करीत आहे. यू टयूब चॅनल च्या या प्ले लिस्ट वरुन कुसुमाग्रजांची कविता दृकश्राव्य स्वरुपात सादर होणार असून हा कलाविष्कार सर्व भाषाप्रेमिंसाठी सर्वत्र मोफत उपलब्ध होणार आहे. पार्श्वसंगीताच्या साथीसह कुसुमाग्रजांच्या कवितांचे छंदबध्द पध्दतीने केलेले अभिवाचन आणि कुसुमाग्रजांच्या कवितांच्या शब्दांची चलतचित्रपाटी असे या कलाकृतीचे वैशिष्ठय आहे. देश विदेशातील मान्यवरांनी तात्यासाहेबांच्या कवितेला चार ते सहा सेकंदात मानाचा मुजरा करणा-या चित्रफिती असेही या कार्यक्रमाचे वैशिष्ठय आहे. या कार्यक्रमाची निर्मिती ‘माइंड रिदम’ च्या समन्वयक तृप्ती चावरे- तिजारे यांची असून अभिवाचन शास्त्रीय संगीत गायक व भाषा अभ्यासक सचिन चंद्रात्रे यांचे आहे. "सुंदर माझी मराठी" मराठी भाषा उच्चार उपक्रमच्या यू टयूब संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा. आपणास हा उपक्रम आवडल्यास आपल्या मित्रमंडळींनाही कळवा. "कविता ऐकू, कविता वाचू, कविता म्हणू आणि कविता जगू !!!" हे You Tube Channel जरूर subscibe करा. “सुंदर माझी मराठी” या मराठी उच्चार साधना उपक्रमाविषयी .... अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बाल-कुमार विभागासाठीही विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे. संमेलनातील बाल-कुमार विभागात स्वयंचलित फलकावर हा उपक्रम, साखळी पद्धतीने दाखविण्यात येणार असून, त्यापुढील ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रमात देखील इच्छुकांना सहभागी होता येणार आहे. कोणतीही ‘भाषा’ ही केवळ एक लिपी नसून विचार आणि भावना व्यक्त करण्याचे ते एक प्रभावी माध्यम असते. भाषा विकासाच्या पैलूला धार लावणारे महत्वाचे साधन म्हणजे त्या भाषेचे उच्चारशास्त्र. सुंदर भावना, आणि नेमके विचार, योग्य आणि स्पष्ट उच्चारात व्यक्त करणे ही एक कला आहे. शुध्दभाषा, प्रमाणभाषा इत्यादी नव्या पिढीच्या डोक्यावरून जाणारे अवघड विचार तूर्तास बाजुला ठेवून सर्वप्रथम, जी भाषा आपण सध्या बोलत आहोत, ती सहज सुंदर बोलण्याचा सोपा विचार करणारा सुंदर माझी मराठी हा उपक्रम आहे. माझ्या बोलण्यातून मला स्वतःला ‘व्यक्त’ कसे होता येते, तसेच, आणखी सुंदर पद्धतीने कसे व्यक्त होता येईल, यासाठी भाषा-कौशल्य विकसित करणारा सुंदर माझी मराठी हा स्वयंचलित वर्ग आहे. भाषेची शुद्धता,स्पष्टता आणि सौंदर्य, ही कौशल्ये या उपक्रमातून विकसित केली जातात. आज अनेक मराठी प्रेमींच्या मनात सुंदर मराठी भाषा तयार आहे, परंतु, ती त्यांना नेमकेपणाने व्यक्त करता येत नाही. मनातले विचार, मनातल्या भावना आणि मनातली भाषा कितीही सुंदर असली तरी स्वतःच्याच बोलण्यातून ती ‘व्यक्त’ होत नाही तोवर तिचा प्रभाव पडत नाही. मराठी भाषिकांच्या व्यक्त होण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी, भाषा बोलण्यासाठीची कौशल्ये विकसित करण्यासाठी सुंदर माझी मराठी या उच्चार वर्गाची निर्मिती झाली आहे. चांगले, सहज-सोपे आणि सुंदर बोलू इच्छिणा-या प्रत्येकासाठी शरीर,श्वास आणि भावनांचे संतुलन साधून देणारा सुंदर माझी मराठी हा उपक्रम आजवर हजारो लोकांनी अनुभवला आहे. बोलतांना जबडा,जीभ, फुफुसे, नाक,तोंड,मुखविवर, गळा,मानेचा कणा, यासारख्या उच्चारनिर्मिती करणा-या शरीरिक अवयवांचा योग्य रीतीने वापर कसा करावा हे या उपक्रमातून सांगितले जाते. प्रगत देशांत “भाषा उच्चार शास्त्र”{Articulation/ Linguistic pho-nation training} ही स्वतंत्र विद्याशाखा अस्तित्वात आहे. भारतीय शिक्षणप्रणालीत मात्र याबाबत फार उदासीनता दिसून येते. यावर काहीतरी काम केले पाहिजे हे ध्यानात घेऊन, “सुंदर माझी मराठी” हा ‘भाषा उच्चार साधना’ उपक्रम तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात भाषा उच्चारांविषयी जागरूकता वाढविणारे ऑडियो-व्हिजुअल वर्ग तयार करण्यात आले असून त्याची निर्मिती व वितरण व्यवस्था “माईंड रिदम कंटेंट डेव्हलपर्स” च्या समन्वयक तृप्ती चावरे – तिजारे यांनी केली आहे. दृक्श्राव्य स्वरुपात सादर होणारा हा उपक्रम सचिन चंद्रात्रे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेला आहे. आपले बोलणे ‘श्रवणीय’ असावे, ते दुसऱ्याने ऐकावे असे ज्याला वाटते, त्याने आधी ‘स्वतःचे’ बोलणे ‘सुंदर’ केले पाहिजे. नीटनेटके आणि सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीकडे जसे लोक आपोआप बघतात, त्यांना वेगळे सांगावे लागत नाही, त्याचप्रमाणे नीटनेटके आणि सुंदर बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लोकांचे कान लागलेले असतात.“माईंड रिदम” च्या सुंदर माझी मराठी या उपक्रमाचा सारांश म्हणजे शरीर,श्वास आणि भावनांचा तोल सांभाळणारा, बोलण्यातले संतुलन साधून देणारा भाषा-त्रिकोण समजून घेणे. याकडे वेळीच लक्ष दिले गेले तर भाषेच्या उच्चारात सहजता येवून ते उच्चार हळूहळू स्पष्ट आणि श्रवणीय होत जातात, त्यातून सौंदर्य दर्शनही घडू लागते. भाषा उच्चाराच्या संतुलनात व्यंजनांची उच्चारस्थाने हाही भाग आहे. दंतव्य,तालव्य,ओष्ट्य,मूर्धन्य इत्यादी वर्णोच्चाराचा अभ्यास योग्य प्रात्यक्षिकासह या उपक्रमातून करवून घेतला जातो. हा उपक्रम नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाच्या बाल-कुमार विभागात सादर होणार असून संमेलनाच्या दिवशी या उपक्रमाचा दृक्श्राव्य आविष्कार यु ट्यूब च्या माध्यमातून लोकार्पण केला जाणार आहे. यासाठी पुढील लिंक बघा. https://docs.google.com/forms/d/e/1FA...
Информация по комментариям в разработке