वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentary

Описание к видео वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentary

निसर्गाचा हिरवा शालू नेसलेली आमची वसई म्हणजे पाहताक्षणी प्रेमात पडावं असं ठिकाण. वसईची केळी तर सुप्रसिद्धच आहेत. कित्येक दशकांपासून वसईच्या केळ्यांना मुंबई व महाराष्ट्राभर मागणी आहे. वसईतील केळी, रसायनं न वापरता भट्टीचा वापर करून पिकवून मुंबईला नेऊन विकण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू होता. एकेकाळी हा व्यवसाय इतका फोफावला होता की कित्येक वसईकरांच्या मुंबईत मोक्याच्या ठिकाणी केळ्याच्या वखारी होत्या. मात्र आता हा पारंपरिक व्यवसाय करणारे फक्त श्री. मायकल तुस्कानो (वय: ७४ वर्षे, राहणार: घोसाळी, नंदाखाल) हे एकमेव उरले आहेत.

ह्या कामासाठी लागणारी प्रचंड अंगमेहनत व वेळखाऊ पद्धत ह्यामुळे आता ह्या व्यवसायात नवीन कुणी येताना दिसत नाही. मायकल काका गेली ६० वर्षे अविरतपणे हा व्यवसाय करत आहेत.

आज मी त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ह्या दिनचर्येत सहभागी होऊन त्यांचा केळी विकत घेऊन, ती झाडावरून काढून, पिकवून मुंबईला नेऊन विकण्यापर्यंतचा दिनक्रम चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रचंड मेहनतीला कुठेही कात्री न लावण्याची खबरदारी घेतल्याने ही चित्रफीत बऱ्यापैकी लांबली आहे मात्र त्यांच्या इतक्या वर्षांच्या तपश्चर्येला केलेला तो एक सलाम आहे असे मी मानतो. तुम्ही देखील आवडीने ही चित्रफीत पाहाल अशी आशा आहे.

धन्यवाद!!

0:00 प्रस्तावना
1:29 केळ्यांची निवड व कापणी
11:44 केळी पिकवायची पारंपरिक पद्धत
11:58 कुक्कुटपालन
20:34 केळ्यांची बांधणी
29:27 विरार ते दादर रेल्वे प्रवास
34:07 दादर स्टेशन ते हिंदू कॉलनी पायी प्रवास
37:39 केळीविक्री व ग्राहकांचे अभिप्राय
44:56 इराणी हॉटेलात नाश्ता
45:13 दादर ते विरार रेल्वे प्रवास
45:54 मायकल काका व त्यांच्या सहचारिणीचे आभार

#vasaichikeli #vasaiculture #haritvasai

Комментарии

Информация по комментариям в разработке