MHATRE GANPATI 2018

Описание к видео MHATRE GANPATI 2018

बाप्पाच्या मूर्तीच्या सौंदर्याबद्दल मला वेगळं लिहायची गरज नाही. मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांनी बनवली आहे एवढं सांगितलं तरी पुरेसे आहे. जिवंतपणा हा विशाल यांच्या मूर्तींचा जणू स्थायीभावच असतो. चेहरा आणि हातांची बोटे यात तर तो ओतप्रोत भरलेला दिसतो. मूर्तीचे मला जाणवलेले विशेष आणि त्याचा मी माझ्यापरिने लावलेला अर्थ असा, एकतर ही मूर्ती 'पारंपरिक' या शब्दात बसणारी मुळीच नाही. बाप्पाची बसण्याची स्टाईलही चौकटी बाहेरची. एकाऐवजी इथे चार उंदीरमामा आहेत. हे चार उंदीरमामा म्हणजे चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असावेत. प्रत्येक उंदीरमामा स्वतःची घंटा शोधत आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке