#आता

Описание к видео #आता

#आता करा फक्त 100/- रुपयात शेतजमिनीची वाटणी I त्यासाठी हा घ्या सरकारी पुरावा GR

नमस्कार मित्रांनो युट्युबवर माझा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर अनेकानी मला विचारले होते की काही मोजकीच तलाठी मंडळी शंभर रुपयावरचे वाटणीपत्र ग्राह्य धरतात. तर अनेक तलाठी रजिस्टर केलेल्या वाटणीपत्राचाच आजही आग्रह धरतात. अनेकांना तर मला कमेंट बॉक्समधुन असाही प्रश्न केला होता की, तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय आहे. मित्रांनो याला पुराव्याची गरजच नाही. कारण महाराष्ट्र जमिन महसूल कायदा कलम-८५ प्रमाणे तहसिलदार यांचेकडून आपण शंभर रुपयांच्या बॉंड पेपरवर वाटणीपत्र करुन घेवू शकतो. खर तर कायद्यातील या प्रक्रियेचा अनेक ठिकाणी अवलंब होत नसल्याचं शासनाच्या निदर्शनास आल्यावरुन खुद्द शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १६ जुलै २०१४ रोजी हे शासन परिपत्रक काढलयं. या परिपत्रकातील मुद्दा क्र. २ व ३ मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे की नोंदणी व मुद्रांक विभागाने दि. १०.५.२००६ रोजी परिपत्रक निर्गमित करुन वाटणीपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही. या बद्दल जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.

मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये वाटणीपत्रासंबधी आपण सगळी चर्चा केलीयं. त्याबद्दलचा पुरावा म्हणून आता संपुर्ण शासन परिपत्रक न वाचता त्यातील फक्त मुद्दा क्र. २ व ३ मध्ये नक्की काय म्हंटलंयं ते या व्हिडिओत आता पाहूया.
गेल्या वर्षि दि. २१ जुलै २०१९ रोजी वाटणीपत्रा संदर्भात मी दैनिक नवशक्ती या वृत्तपत्रात लेखही लिहला होता. तो लेख तुम्ही दैनिक नवशक्तीच्या संकेत स्थळावर जावून जरुर वाचा.

खरं तर महाराष्ट्र महसूल कायद्यांत ही तरतूद करण्यात आल्यानं तहसिलदार यांचेकडे रितसर अर्ज करुन वडिलोपार्जीत शेतजमिनीचे वाटपपत्र तुम्हाला निश्चितच करुन घेता येईल. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरुर लिहा. तुमचे काही प्रश्न असल्यास जरुर विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयहिंद. जयमहाराष्ट्र.


#PartitionDeed#200#वाटणीपत्र#शेतजमिन

Dhanraj Kharatmal, B.Com.,LLB.

Комментарии

Информация по комментариям в разработке