Manorama Khedkar यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली ? त्यांच्यावरचे आरोप आणि त्यांचा पूर्ण इतिहास काय ?

Описание к видео Manorama Khedkar यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली ? त्यांच्यावरचे आरोप आणि त्यांचा पूर्ण इतिहास काय ?

#BolBhidu #ManoramaKhedkar #IASPoojaKhedkar

आधी बातमी आली प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्याची, मग बातमी आली त्यांचे आई वडील अडचणीत आल्याची, मग बातमी आली पूजा खेडकर यांचे आई वडील फरार असल्याची आणि १८ जुलैला बातमी आली, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक. मनोरमा खेडकर यांच्यावर १२ जुलैला गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून खेडकर दाम्पत्य फरार झालं होतं. कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस खेडकरांच्या बाणेर इथल्या बंगल्यावर गेले, पण तिथं कुणीच आढळून आलं नाही. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. पण त्यांचा कुठच थांगपत्ता लागत नव्हता. आता मनोरमा खेडकर यांना रायगडच्या महाड इथल्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये त्या नाव बदलून राहत होत्या. त्यांना कोर्टात हजर केल्यावर त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यानंतर चर्चेत आला आहे, तो मनोरमा खेडकर यांचा इतिहास. मनोरमा खेडेकर यांच्या घरात एकूण तीन IAS पदं राहिली आहेत. त्यामुळं त्यांचं कुटुंब गावातील प्रतिष्ठित घराणं म्हणूनच ओळखलं गेलंय. स्वतः मनोरमा खेडेकर यांनीही सरपंच पद भूषवलेलं आहे. मनोरमा यांच्यावर सध्या आरोप होत असले तरी सरपंच पदावर असताना मनोरमा यांनी गावचा कायापालट केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावातल्या विकासकामांचं क्रेडिट त्यांनाच दिलं जातं. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर सगळं गाव त्यांच्या बाजुनं एकवटलं आहे. त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित थेट मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. पण मनोरमा खेडकर यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक झाली आहे ? त्यांच्यावर काय आरोप होतायत? त्यांचा नेमका इतिहास काय ? पाहुयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке