झटपट होणारे रव्याचे आप्पे / instant rava aape सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी😋

Описание к видео झटपट होणारे रव्याचे आप्पे / instant rava aape सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी😋

माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे.

आप्प्यांची साहित्य
रवा
तांदळाचे पीठ
ताक
पाणी
कांदा बारीक चिरलेला
हिरवी मिरची पेस्ट जिरे
कोथिंबीर
जिरे
तेल
खाण्याचा सोडा

बनवायची कृती:
रवा तांदळाचे पीठ ताक पाणी घालून मिश्रण दोन तासासाठी भिजत ठेवायचे. दोन तासानंतर त्याच्यामध्ये, बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरचीची पेस्ट जिरे मीठ कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ज्यावेळी आप्पे बनवायचे असतात तेव्हा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून मिश्रण चांगले मिक्स करायचे, नंतर तीन चमचे तेल घालून परत चांगले मिक्स करून घ्यायचे. आप्पे बनवायच्या पात्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आप्पे दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे.

ओल्या खोबऱ्याची चटणी साहित्य:
किसलेले ओले खोबरे दोन वाटी
मीठ
पाणी
फोडणीचे साहित्य:
तेल
हिंग पावडर
मोहरी
तीळ
कढीपत्ता
कोथिंबीर

कृती:
खोबरे पाणी मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे.

नंतर चटणीसाठी फोडणी तयार करून घ्यायची.
तयार केलेली फोडणी बारीक करून घेतलेली खोबऱ्याच्या पेस्टमध्ये घालून घ्यायचे. चटणी खाण्यासाठी तयार.


रव्याचे आप्पे# इन्स्टंट आप्पे# food #aape#recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке