वाडा-खानिवली || सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना वाडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच केली अटक

Описание к видео वाडा-खानिवली || सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना वाडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच केली अटक

#wada #vada #palgharnewsnetwork #pnn #palgharnews #police #crime #robbery #news #khanivali
#video_grapher_Jitesh(Munna)_Patil
पालघर जिल्ह्यातिल वाडा तालुक्यातल्या खानिवली येथे मागील दोन आठवड्यांपूर्वी एका घरात 50 लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळवून रात्रीच्या सुमारास जबरी चोरी करणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना वाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे .
हकीकत अशी आहे की वाडा तालुक्यातील खानिवली येथील 52 वर्षीय मनीषा भानुशाली यांच्या राहत्या घरात दिनांक 12/ 7/ 2024 रोजी संध्याकाळी 8:30 वाजता ते दिनांक 13/07/2024 पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास चार अनोळखी सशस्त्र आरोपींनी दरोडा टाकून काही रोख रकमेसह एटीएम , सोना-चांदीचे दागिने आणि बाईक जबरी चोरी करून फरार झाले होते इतकेच नाही तर जाताना फिर्यादीच्या घरात असलेले सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर काढून व घरातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना घराचे दरवाजाची बाहेरील कडी लावून जवळपास 2 लाख 31 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून फरार झाले होते. खरं म्हणजे आरोपीने सहा तासाहून अधिक घरात ठाण मांडून आरोपींनी एटीएम मधे जाऊन तक्रारदाराच्या मोटर सायकलने जाऊन तक्रारदाराच्या खात्यातून 20000 रुपये रोकड रक्कम सुद्धा काढून आणली होती. फिर्यादीच्या घराजवळच असलेल्या देवानंद रमेश तुंबडा वय वर्षे 31 राहणार वसुरी तालुका वाडा जिल्हा पालघर व संतोष कृष्णा तरे वय वर्षे 37 राहणार सोनाळे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या आरोपीनी अविनाश सुभाष पवार वय वर्षे 25, राहणार एकुरका पोस्ट जवळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव, रॉकी उर्फ रमेश भैरू धावारे वय वर्ष 30 राहणार कल्याण मुळगाव एकुरका, जिल्हा धाराशिव, आकाश काळूराम संते वय वर्ष 28 राहणार पलावा कासाविला डोंबिवली पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे, रामप्रकाश गायकवाड राहणार कल्याण या आरोपींना सदर घरात 50 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती दिल्यानंतर या दरोडेखोरांकडून हा दरोडा टाकण्यात आला होता त्यानुसार वाडा पोलिसांनी आरोपींविरोधात वाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान अंतर्गत गुन्हा दाखल केला होता . त्यानंतर वाडा पोलिसांनी कोणत्याही धागेदोरे नसताना पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी, पोलीस हवालदार विजय मडवी, महिला पोलीस हवालदार हर्षला देहेरकर , पोलीस शिपाई गजानन जाधव, पोलीस शिपाई चेतन सोनवणे, पोलीस शिपाई संतोष वाकचौरे , पोलीस शिपाई भूषण खिल्लारे, पोलीस शिपाई हरेश काळे मोठ्या शिताफीने या आरोपींना मोबाईल द्वारे ट्रेस करत अटक केली आहे . तसंच या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली . दरोडा टाकणारे 4 आणि या दरोडेखोरांना माहिती देणाऱ्या 2 अशा तब्बल 6 आरोपीं पैकी 5 आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून अजूनही एक आरोपी फरार असून त्याचा शोध सध्या वाडा पोलिसांकडून सुरू आहे. तर अवघ्या दोन आठवड्यात वाडा पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींच्या मुस्क्या आवळल्याने भीतीच्या छायेत असलेल्या तक्रारदार पीडित कुटुंबीयांकडून पोलिसांच्या उत्तम कार्यपद्धतीवर आनंद व्यक्त करत आभार देखील मानले.

Комментарии

Информация по комментариям в разработке