सोलापुरकरांनी अनुभवली कथ्थक नृत्याची जुगलबंदी

Описание к видео सोलापुरकरांनी अनुभवली कथ्थक नृत्याची जुगलबंदी

#YesNewsMarathi #SolapurNews #kathakNritya
सोलापूर : सोलापुरकरांनी शनिवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात कथ्थक नृत्याची अनोखी जुगलबंदी पाहिली. जगप्रसिद्ध नृत्यांगना मनीषा साठे, मुलगी शांभवी दांडेकर, सून तेजस्वीनी साठे, नात सर्वेश्‍वरी साठे या तीन पिढ्यांच्या कलाकारांनी व्यासपीठावर एकाहून एक अशा कथ्थक नृत्याच्या रचना सादर केल्या आणि हुतात्मा स्मृती मंदिरात टाळ्यांचा पाऊस पडला.

अर्पित कथ्थक नृत्यालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. वेगवेगळे राग, तालावरचा ठेका, बासरीचे सूर आणि ठेक्यावर घुंगरांचा आणि पायांची हुकमत गाजविणार्‍या या चार नृत्यांगना यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. संयोजिका मनीषा जोशी यांनी सर्वच कलाकारांचा सत्कार केला. सोलापुरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनीषा साठे यांनी सर्वांचे आभार मानले. पहा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात रंगलेला हा कथ्थक नृत्याविष्कार...
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com/
Facebook:-   / yesnewsmarathi  
Twitter:-   / yesnewsmarathi  

★Contact us★
mobile- 9881748329
Email:- [email protected]

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке