माननीय विधिमंडळ गटनेते श्री. जयंतराव पाटील | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई

Описание к видео माननीय विधिमंडळ गटनेते श्री. जयंतराव पाटील | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई

माननीय विधिमंडळ गटनेते श्री. जयंतराव पाटील | पावसाळी अधिवेशन २०२४ | मुंबई

विधानसभेतील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेत श्री. जयंतराव पाटील यांनी सहभाग घेतला. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने काय केलं? काय करत आहे? याचा डंका पिटण्यापलीकडे काही विशेष दिसलं नाही, असे राज्य सरकारवर त्यांनी ताशेरे ओढले. त्यांच्या भाषणात ८५ मुद्दे आहेत, त्यातील ५ मुद्दे तरी महाराष्ट्राच्या जनतेचे हिताचे असते तर मी त्यांचं कौतुक केलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल म्हणतात निर्यातीत आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. नीती आयोगाने २०२२ साली एक्सपोर्ट प्रिपेरनेस इंडेक्स तयार केला, त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो आमच्या सरकारच्या काळात आलेला आहे, राज्य निर्यातीत अग्रेसर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आता महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर घसरलेला आहे व गुजरात पाचव्या क्रमांकावर जाऊन बसलं ही महाराष्ट्राची खरी खंत आहे.

राज्यपालांनी भाषणात केलेल्या उल्लेखाप्रमाणे, २०२७- २८ सालापर्यंत एक ट्रिलीयन डॉलरची महाराष्ट्राची इकोनॉमी करण्यासाठी महत्वकांक्षी लक्ष आहे. हा दावा वास्तववादी नाही असे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितले. त्यासाठी ग्रोथ रेट १७ टक्के असणे आवश्यक आहे हे लक्षात आणून देणे गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या जनतेने आता निर्णय घेतला आहे की, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं व जगदंबा तलवार भारतात आलेले नाहीत. मागच्या वर्षीच्या राज्यपाल भाषणात देखील त्याचा उल्लेख होता, आताही आहे पण ते काही भारतात आलेलं नाही, असा शेरा जयंत पाटील यांनी लावला. शिवाजी महाराजांचे स्मारकही सरकार करत नाही, त्यामुळे त्यांच्या नावावर मतं मागण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहिलेला नाही. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी कोणतेही पाऊल सरकार टाकत नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमेबाबत राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे, परंतु दोन वर्षांत काहीच झालेलं नाही.

अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती होऊ लागली. राज्यपालांचे भाषण हे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारे नाही, शेतकरी व शेतमजूरांकडे दुर्लक्ष करणारे आहे. अशा शब्दांत श्री. जयंतराव पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध दर्शवला.

#MonsoonSession2024  #MonsoonSession  #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #jayantpatil

Комментарии

Информация по комментариям в разработке