#manmokali_bhatkanti #musium #museum #pune #museuminpune
राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय सन. १८९६ ते १९९० पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.
१९२२ साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय, वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.
विभागवार संग्रहालयाची दालने
मस्तानी महाल
लाकडी कोरीव काम विभाग:-
लाकडी नक्षीकामाचे छत, दरवाजे, खडक्या, गणेशपट्या, झरोके, जयविजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषानच्या मूर्तीसुद्धा या विभागात आहे. या वस्तू महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दक्षिण भारत वेगवेगळ्या राज्यातून जमविले आहे.
प्रसाधने व गुजरात दालन विभाग:-
तळपाय घासण्यासाठी वापरीत असलेल्या वजा-या, कुंकुमकरंडे, वेणीफणीच्या पेट्या, आरसे, सुरमादान, अत्तरदान, कंगवे,फण्या, स्त्रियांचे दागदागिने, अत्तराच्या कुप्या
चंद्रशेखर आगाशे विभाग
या शाखेत सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर आगाशे यांनी आपला पुत्र दिवंगत उद्योगपती चंद्रशेखर आगाशे यांच्या पुरातन भारतीय वाद्य संग्रहांचा समावेश केला आहे.
संग्रहलयाची वेळ ही दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 अशी असते. तिकीट हे 12 वर्षाखालील मुलांना 30 रुपये तसेच 12 वर्षावरील सर्वाना 100 रुपये असे आहे. आपण जर आतमध्ये कॅमेरा वापरणार असाल तर आपल्याला प्रत्येक कॅमेऱ्याचे 100 रुपये एक्सट्रा भरावे लागतात.
Join this channel to get access to perks:
/ @manmokali_bhatkanti
#मनमोकळी_भटकंती
Информация по комментариям в разработке