श्री. संजय जाधव & परिवार वास्तूशांती पुजा,

Описание к видео श्री. संजय जाधव & परिवार वास्तूशांती पुजा,

पूर्वीच्या काळी अंधवधाच्या वेळी शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले त्यापासून एक भीषण व अक्राळविक्राळ प्राण्याची निर्मिती झाली. तो पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला पिऊ लागला. पृथ्वीवर एकही थेंब रक्त शिल्लक राहिले नाही तेव्हा तो शंकराची तपश्चर्या करू लागला. शंकराला प्रसन्न करून त्याने तिनंही लोकांना संपवण्याचा वर मागितला. तेव्हा घाबरून देवांनी त्याच्या अंगावर उड्या घेतल्या आणि त्याच्या ज्या अंगाचा ताबा ज्या देवतेने घेतला त्यालाच आपले स्थान बनवले. त्या दबलेल्या प्राण्याने परत शंकराची प्रार्थना केली. देवांच्या या कृतीने मी मरून जाईन माझी भूक शांत करायचा काही उपाय सांगा. तेव्हा शंकराने त्याला वास्तुशांतीच्या वेळी वाहिली जाणारी सामग्री भक्षण करण्यास सांगितले आणि हे सांगितले की जे वास्तुशांती करणार नाहीत ते ही तुझे भक्ष्य होतील. याच प्राण्याला वास्तुदेवता किंवा वास्तुपुरुष म्हणतात आणि तेव्हापासून वास्तुशांतीस सुरवात झाली.
काही वेगळ्या कथा पण प्रचलित आहेत. सर्व कथांमध्ये सांगितलेला वास्तुपुरुष एकच आहे. त्याला भवन-निवेशामध्ये वेगवेगळ्या प्रकार कल्पिलेले आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке