Shane Warne चा धुव्वा Wankhede वरची बॅटिंग, या 3 Innings सांगतात Vinod Kambli किती भारी होता

Описание к видео Shane Warne चा धुव्वा Wankhede वरची बॅटिंग, या 3 Innings सांगतात Vinod Kambli किती भारी होता

#BolBhidu #vinodkambli #cricket

विनोद कांबळीच्या चैनीचे किस्से, भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असणारा विषय. सध्याही विनोद कांबळी ट्रेडिंग विषय आहे, त्याचं कारण म्हणजे त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ. रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीचिन्हाचं अनावरण करण्याच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कांबळी बोलायचा प्रयत्न करत होता, सचिनला आपल्या शेजारी बसवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला बोलायला सांगितलं पण त्यानं गाणं म्हणलं, त्यानं सचिनला आग्रह केला तेव्हा त्याला थांबायला सांगण्यात आलं आणि या सगळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. कुणी म्हणलं की कांबळी दारु पिलेल्या अवस्थेत होता, म्हणून अशी वेळ आली, तर कुणी म्हणलं की कांबळी आजारी आहे म्हणून अशी वेळ आली. टीका दोन्ही बाजूंनी कांबळीवरच झाल्या.

आता कांबळी आणि टीका हा पण काय नवा विषय राहिलेला नाही, कांबळी कुठल्याही प्रकरणात घावला की दारुच्या विषयापासून कांबळी कसा बेशिस्त होता इथपर्यंत चर्चा होते आणि या सगळ्यात निघतात ती कांबळीची मापं. पण विनोद कांबळी प्लेअर म्हणून सुद्धा कमी नव्हता, त्याचं करिअर भले छोटं ठरलं असेल, पण कांबळी दणका खतरनाक द्यायचा. असाच दणका त्यानं तीन मॅचेसमध्ये दिला होता, त्या ३ मॅचेस कुठल्या ? त्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं होतं ? पाहुयात या व्हिडीमधून.



चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке