राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या मतदान

Описание к видео राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या मतदान

दि.१९.११.२०२४ :
राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी झंझावाती प्रचारसभा घेतल्या. गेले पंधरा दिवस निवडणूक प्रचारानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर ला मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ३६३ महिला उमेदवारांसह एकूण चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे.
राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1 लाख 427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
तसंच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची तसंच विविध राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या १५ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता काल झाली.
Official YouTube channel of DD Sahyadri News

Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.

DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.

Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.

Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
Youtube --    / @ddsahyadrinews  

Twitter --   / ddsahyadrinews  

Instagram --   / ddsahyadrinews  

#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray

Комментарии

Информация по комментариям в разработке