पाटेश्वर मंदिर : दुर्मिळ अद्भुत प्राचीन मूर्त्या, लेण्या व हजारो रहस्यमयी शिवलिंग असलेले |

Описание к видео पाटेश्वर मंदिर : दुर्मिळ अद्भुत प्राचीन मूर्त्या, लेण्या व हजारो रहस्यमयी शिवलिंग असलेले |

पाटेश्वर मंदिर : दुर्मिळ अद्भुत प्राचीन मूर्त्या, लेण्या व हजारो रहस्यमयी शिवलिंग असलेले | #viral

Pateshwar Shiv Mandir Satara
साताऱ्यातील हे ठिकाण खरंतर जगप्रसिद्ध असायला हव होत..
पण ते नाहिये..
तुम्ही हा video जर तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवला तर नक्किच हे ठिकाण सर्वांना माहित होईल..

Pateshwar | अद्भूत पाटेश्वर आणि रहस्यमयी, प्राचीन लेण्या, मुर्ती, मंदिरे आणि त्यांचा पूर्ण इतिहास

Pateshwar mandir | 1000 शिवलिंगचे रहस्य | साताऱ्यातील जुने पाटेश्वर शिवमंदिर | देगाव | सातारा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाटेश्वरची लेणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील लेणी आहेत. सातारा शहरापासून १४ किमीवर देगाव हे गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या बामणोली डोंगर रांगेतल्या एक डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर व लेणी आहेत. या लेण्यांची समुद्रसपाटीपासून उंची ३०२५ फूट आहे.
#vlog #vlogger #gadkille #marathivlog #marathivlogger #maharashtravlogs , #vlogger , #marathivlog #viral #views #viralvideo #vloggers #marathi #viralvlog #vlogging #marathivlogs #history #maharashtra #video #million #travel #travelvlog #travelvloger #travelling #travellingvlog #traveller #tranding #trandingvideo #forts #satara



Your Queries :
पाटेश्वर मंदिर सातारा
पाटेश्वर मंदिर
पाटेश्वर
बटेश्वर मंदिर
पाटेश्वर मंदिर व लेणी
पाटेश्वर शिव मंदिर
पाटेश्वर महादेव मंदिर
पाटेश्वर महादेव मंदिर सातारा
पाठेश्वर मंदिर सातारा
पाटेश्वर मंदिर देगाव
देगाव पाटेश्वर मंदिर
पाटेश्वर धाम मंदिर
पाटेश्वर मंदिर माहिती
बटेश्वर नाथ मंदिर
पाटेश्वर धाम
पाटेश्वर धाम मंदिर गोटाटोला
जामड़ीपाठ पाटेश्वर धाम मंदिर
पाटेश्वर लेणी
pateshwar temple | पाटेश्वर मंदिर
सिद्ध पीठ श्री पाटेश्वर महादेव मंदिर
pateshwar satara
satara
pateshwar mandir satara
pateshwar
pateshwar temple satara
pateshwar mandir satara mahiti
pateshwar temple
pateshwar satara in marathi
pateshwar mandir
pateshwar mandir satara information
pateshwar caves satara
pateshwar dham
pateshvar
pateshwara
satara tourism
pateshwar shiva temple
satara pateshwar mandir
bateshwar temple
degaon pateshwar
satara
pateshwar temple satara
mahadev mandir pateshwar
temples in satara




१. पाटेश्वरचा डोंगर चढतांना रस्त्यात दगडात कोरलेली गणपतीची प्राचीन स्त्रीवेषधारी मूर्ती दिसते.. डोंगरावर सुरुवातीला कमळांनी भरलेली "विश्वेश्वर पुष्करणी" आहे. या पुष्करणीच्या एका भिंतीवर शंकराची दुर्मीळ अशी "अज एकपाद" मूर्ती कोरलेली आहे, या शिल्पातील मूर्तीला एकच पाय कोरलेला आहे.
२. पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे, या लेण्याला मरगळ म्हशीचे लेणे म्हणतात असे जरी असले तरी या लेणीमध्ये जे आहे त्याला नंदिकेश्वर असे नाव आहे कारण तिथे नंदीचे म्हणजेच वृषभाचे वशिंड याला शिवलिंगाचे रूप दिले आहे. या बरोबरच लेण्यात एकूण ६ शिवलिंग ओळीने कोरलेली आहेत. यातील एक शिवलिंग कोरलेल्या दंडगोलाकार उंचवट्यासारखे आहे. याच गुहेतील एका शिल्पपटात पाच शिवलिंगे कोरलेली आहेत. ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात, अशी समजूत आहे.
३. पुष्करणीजवळूनच पायर्‍यांचा मार्ग पाटेश्वर मंदिराकडे जातो. या मार्गावर २ शिवलिंगे आहेत. यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत. तर दुसर्‍या शिवलिंगावर मध्यभागी मुख्य शिवलिंगावर दाढी, मिशा असलेला शंकर कोरलेला आहे आणि बाजूने ७१ दंडगोलाकार शिवलिंगे कोरलेली आहेत.
पाटेश्वरचे मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व ४ फूटी उंच शिवलिंग यांची प्रमाणबध्दता व त्‍यावरील तकाकी पहाण्यासारखी आहे.
४. या पाटेश्वराच्या मंदिरानंतर पुढे ५ लेण्यांचा गट असलेले "बळिभद्र मंदिर लेणे" आहे. यात एक ठिकाणी शिवपिंडीच्या बाजूने चक्र, बदाम, गोल इत्यादी आकारात दहा आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यातील ८ आकृत्या आठ दिशा व २ आकृत्या सूर्य व चंद्र यांची प्रतीके आहेत. यशिवाय या लेण्यात दशवतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, महिषासूरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा इत्यादी शिल्पेही पहायला मिळतात. या लेण्यांत मानव व बैल यांची एकत्रित अशी "अग्नि-वृष"ची अप्रतिम मूर्ती आहे. या मूर्तीला ७ हात असून हातात आयुधे व मुद्रा कोरलेल्या आहेत. समोरून पाहिल्यास मूर्ती दाढीधारी माणसाची दिसते तर बाजूने पाहिल्यास चेहर्‍यात नंदी(बैल) दिसतो. हा आभास साधण्यासाठी दाढी मध्ये दोन खाचा कोरलेल्या आहेत, त्या बैलाच्या नाकपुडीसारख्या दिसतात. या "अग्नि-वृष" मूर्तीचे, सौंदर्य, प्रमाणबद्धता, व शिल्पकाराची कल्पकता अद्‌भुत आहे.
५. बळिभद्र लेण्यानंतर वर्‍हाडघर हा ३ लेण्यांचा समूह आहे. त्यातील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात पार्वतीची मूर्ती व बाजूला ९७२ शिवलिंगे कोरलेली आहेत. ९७२ ही संख्या देवीची १०८ शक्तिपीठे व प्रत्येक पीठाची ९ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात विष्णूची मूर्ती व बाजूला १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. १००० ही संख्या विष्णूच्या हजार नावांचे प्रतीक आहे.
याच दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात सूर्याची मूर्ती व बाजूला पुन्हा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत.
याशिवाय या लेण्यांत कुंडलिन शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहेत, परंतु पुसट झाल्यामुळे हे शिलालेख वाचता येत नाहीत.

Комментарии

Информация по комментариям в разработке