शिवाजी महाराज वाघनखं: लंडनवरून येणारी 'ती' वाघनखं नेमकी कोणाची? इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात...

Описание к видео शिवाजी महाराज वाघनखं: लंडनवरून येणारी 'ती' वाघनखं नेमकी कोणाची? इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात...

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून भारतात वाघनखं आणली जाणार आहेत. वाघनखं म्हटली की, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो. पण ही वाघनखं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे.
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या संचालकांनीही ही वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडं नसल्याचं म्हटलं आहे.
ही वाघनखं नेमकी कोणत्या काळातील आहेत? इंद्रजित सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे या वाघनखांचा कोणता इतिहास समोर मांडला आहे? यावरून सध्या काय राजकारण सुरू आहे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ...
#prashantkadam #वाघनखं #इंद्रजित सावंत #छत्रपती शिवाजी महाराज

Комментарии

Информация по комментариям в разработке