कांदा थ्रिप्स व मावा नियंत्रण कसे करावे । Kanda thrips va mava niyantran |

Описание к видео कांदा थ्रिप्स व मावा नियंत्रण कसे करावे । Kanda thrips va mava niyantran |

कांदा थ्रिप्स -मावा नियंत्रण

शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्हाला माव्याचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकावर झालेला दिसणार आहे अशा वेळी तुम्हाला कांद्याच्या पातीचे टिप्स किंवा जे शेंडे आहेत ते पिवळे पडून जायला लागले दिसणार आहेत त्याचबरोबर तर कांद्याच्या गाभ्या मध्ये तुम्ही चेक केलं किंवा माने मध्ये आपण जर चेक केलं तर पोपटी रंगाच्या आणि काळा रंगाचे कीटक देखील तुम्हाला आढळून येणार आहेत त्याचबरोबर पाती वरती तुम्हाला ओरखडल्यासारखे पांढरे पांढरे डाग दिसणार आहेत जे की एक बारीक लाईन सारखे असणारे आणि पांढऱ्या रंगाचे असणार आहेत.ज्या वेळेस या किटकांचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये होतो किंवा आपल्या पिकावर होतो अशा वेळी हे कीटक आपल्या पिकांमधील किंवा पाती मधील हरितद्रव्य खातात ज्याने करून प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते आणि आपला कांदा पुढे जाऊन पिवळा पडलेला दिसतो आणि व्यवस्थीत पोसत नाही. कीटकांच्या नियंत्रणासाठी जर आपण फवारणी केली नाही तर नक्कीच आपल्याला उत्पन्नामध्ये घट दिसणार आहे तर आपण बघूया की यामध्ये आपण कोणकोणती कीटकनाशके वापरू शकतो जेणेकरून मावा आणि थग्रिप्स सारखे कीटक आपल्याला नियंत्रित झालेली दिसतील.

प्रतिबंधात्मक उपाय साठीची फवारणी
१) एक्ट्रा किंवाअरेवा (थिओमेथोक्साम २५% डब्ल्यूजी) @ ०.५ ग्राम प्रति लिटर पाणी
किंवा

१) माणिक( एसिटामिप्रिड 20% SP) @ ०.५ ग्राम प्रति लिटर पाणी


किटकांचा प्रादुर्भाव असेल तर आपण कोण कोणते किटकनाशक वापरावे.

१) प्रोफेक्स सुपर ( प्रोफेनोफॉस + सायपरमेथ्रीन ) @ २ मिली प्रति लिटर पाणी
२) ऍडमायर (इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी) @ ७ ग्राम प्रति १५ लिटर पाणी

आपण आधीच फवारणी घेतलेली आहे परंतु तरी देखील तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्स किंवा मावा हा कंट्रोल झालेला नाही अशा वेळी आपण कोणत्या औषधाची फवारणी करू शकतो

किफन ( टोलफेंपायरॅड १५ इ सी ) @ २ मिली मिली प्रति लिटर पाणी


महत्वाच्या टिप्स


१) फवारणी मध्ये स्टिकरचा वापर
२) औषधाची फवारणी ही वारंवार करू नका
३) वापसा कंडिशन वर असताना फवारणी करणं हे महत्त्वाचं ठरेल
४) टेरीकॉन्टानोल घटकाची फवारणी ( विपुल बूस्टर किंवा मिरॅक्युलन @ २ मिली मिली प्रति लिटर पाणी)

शेतकरी मित्रांनो आपल्याला काळजी फक्त एकच घेयची आहे. ती म्हणजे फवारणी करते वेळी पिकावरील धुकेमुळे साचलेले पाणी झटकून नंतरच फवारणी करायची आहे.

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.

काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?i...

उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

Комментарии

Информация по комментариям в разработке