गुरूपौर्णिमा २२/०७/२०२४

Описание к видео गुरूपौर्णिमा २२/०७/२०२४

*🌹🌹पलूसकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांचा सत्कार समारंभ, व्याख्यानाचे आयोजन..*🌹🥇🌴🌳📙📚📚📚🏆🥈🌺.


गुरू ने दिला ज्ञानरुपी वसा..
  आम्ही चालवू हा पुढे वारसा...
      
गुरुब्रम्हा,गुरुर्विष्णु,गुरुर्देवो महेश्वर
गुरुःसाक्षात् परब्रह्म,तस्मै श्रीगुरवे नम...
🥇🌴🌳📙📚📚📚🏆🥈🌺.


                      *आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी  उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.टी.जे.करांडे (सर) ,जेष्ट शिक्षक ए.जे.सावंत सर,,सौ.पी.व्ही. नरुले मँडम,सर्व शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील सर्व गुरुजनांचा, सर्व शिक्षक शिक्षिका यांचा सुंदर असे गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली*.
*सर्वांचे स्वागत प्रास्ताविक कु. अंजली पाटील ने केले. यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख पोतदार सर जेष्ट शिक्षक आनंदराव सावंत सर , दहावी क तील विद्यार्थिनी कु. राधा कदम, संस्कार कदम शुभम गोंदिल, रोहन कदम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले*.
*सुञसंचालन राजनंदिनी शिंदे, तनुजा सूर्यवंशी यांनी, आभार सृष्टी ओतारी ने मानले*.

*सांस्कृतिक विभाग, वर्गशिक्षक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुंदर नियोजन केले*.
   *शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा. उदय परांजपे ( साहेब) , उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा, सर्व संचालक,यांनी सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या*.
🥇🌴🌳📙📚📚📚🏆🥈🌺.


     गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.प्राचीन  काळापासून गुरुशिष्यांची  परंपरा चालत आली आहे. व्यास आणि गणेश, वसिष्ठ आणि राम,  कृष्ण आणि सांदिपनी,  मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्तीनाथ- ज्ञानदेवमहाराज, जनार्दन स्वामी -एकनाथमहाराज अर्जुन-द्रोणाचार्य,  एकलव्य-द्रोणाचार्य,   आगरकर--गांधी,  सचिन तेंडुलकर-रमाकांत   आचरेकर अशी अनेक  उदाहरणं देता येतील. भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भरभरून दिले पाहिजे विविध उदाहरणे देऊन गुरुपौर्णिमेचे महत्व विशद केले गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. गुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन होय.आपल्या  संस्कृतीमध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला अनन्यसाधारण  महत्त्व आहे.गुरूशिष्यांच्या   परंपरेत आपल्याकडे अनेक  नावे आहेत. या सर्वांचा आदर्श समोर ठेऊन आपण वाटचाल केली पाहिजे.


गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....🌹🌹🌹🙏🌹


     

Комментарии

Информация по комментариям в разработке