Gopalkala, Janmashtmi special Prasad गोपाळकाला, कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोपाळकाला, दहीहंडी चा प्रसाद

Описание к видео Gopalkala, Janmashtmi special Prasad गोपाळकाला, कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोपाळकाला, दहीहंडी चा प्रसाद

गोपाळकाला
गोपाळकाला करण्याची साहित्य आणि कृती
साहित्य :-
१) १ वाटी पोहे
२) अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या
३) एक वाटी दही
४) २  टे.स्पून भिजवलेली हरबरा डाळ
५) डाळिंब, सफरचंद, मोसंबी, अशी आपल्या आवडीची फळे 
६) एक लहान काकडी बारीक चिरलेली
७) १  हिरवी मिरची बारीक कट करून.
८) १/२ टे. स्पुन पिठी साखर.
९) चवीनुसार मीठ
१०) २/३ टे. स्पुन कोणतेही लोणचे.
११) बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणी साठी :-
*जिर मोहरी, हिंग कढीपत्ता, आणि तेल

कृती :- 
१) सगळ्यात आधी पोहे २ ते ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या. भिजवून घ्या. 
२)  दह्यामध्ये मीठ आणि साखर घालून ते व्यवस्थित फेटून घ्या आता या फेटलेल्या दह्यामध्ये अनुक्रमे बारीक कट केलेली काकडी, सफरचंदा चे तुकडे, डाळिंबाचे दाणे, मोसंबी चे तुकडे, भिजवलेली चणा डाळ, ज्वारीच्या लाह्या असे सर्व साहित्य टाकून मिक्स करा मग यात बारीक कट केलेली मिरची टाकून मिक्स करा, नंतर यात भिजवलेले पोहे टाकून छान एकजीव करून घ्या, सर्वात शेवटी यात लोणचे टाकून पुन्हा मिक्स करा.
३) आता एका छोट्या कढईमध्ये तेल तापवुन त्यात जिरे- मोहरी हिंग- कढीपत्ता ची पाने टाकून फोडणी करा आणि ती आपल्या गोपाळकाल्यामध्ये टाका.मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करून घेतलं की गोपाळकाला झाला तयार.
#janamashtmispecial #krishna #krishnajanmashtami #janmashtmispecialgopalkala #dahihandi #prasad #krishnaprasad #spritual #bhog #lordkrishna #गोपाळकाला #कृष्णजन्माष्टमी
#कृष्ण #दहीहंडी #प्रसाद #काला

Комментарии

Информация по комментариям в разработке