Kanheri Caves | कान्हेरी लेणी | borivali | Sanjay Gandhi National Park | बिबट्याचे वावर

Описание к видео Kanheri Caves | कान्हेरी लेणी | borivali | Sanjay Gandhi National Park | बिबट्याचे वावर

कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरीवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहेत. ही लेणी इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. १ ले शतक यादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरीवली उद्यानाच्या मधोमध आहेत.[१] 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कृष्णगिरी (अर्थ: काळा डोंगर/पाषाण) या पाली नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ६ कि. मी. व बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि. मी. अंतरावर आहेत.[२] पर्यटकांसाठी ह्या लेणी (गुंफा) सकाळी ९ पासून उघड्या असतात. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते.

बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहेत.

कान्हेरी लेणी (गुंफा) या संजय गांधी राष्ट्रीय पार्कच्या (बोरीवली नॅशनल पार्कच्या) अगदी आतील बाजूस आहेत. पण तेथे जाण्यासाठी (?)प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे (कुठून?). पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्काच्या मुख्य गेटावर आणि गुंफाच्या प्रवेश द्वारावर प्रवेश शुल्क भरावे लागते.

धन्यवाद 🙏🏻😊

Like | Subscribe

Комментарии

Информация по комментариям в разработке