मेंढजोगी - धनगर समाजाच्या वंशावळी जतन करणारे Mendhjogi

Описание к видео मेंढजोगी - धनगर समाजाच्या वंशावळी जतन करणारे Mendhjogi

#मेंढजोगी
(धनगर समाजाच्या वंशावळी जतन करणारे)

▶   • मेंढजोगी - धनगर समाजाच्या वंशावळी जतन...  

विविध समाजाच्या वंशावळी जतन करणारे हेळवी, मेंढजोगी, माळगण वंशपरंपरागत आपला व्यवसाय, सामाजिक बांधिलकी जपत आजही विविध गावांना भेट देऊन मुक्कामी राहून वंशावळ जतन करीत आहेत. आजही धनगर समाजामध्ये मेंढजोगी आपले कार्य व येणारी नवीन तरुण पिढीही वंशावळ जतन करण्याचे कार्य करीत असल्याचे इंदापूर तालुक्यातील वरकुटे यागावी आम्ही श्री विठ्ठल सोडनवर सर, पञकार रविंद्र खोरकर, युवा उद्योजक श्री महेश गडधे पाटिल, श्रीकांत हंडाळ दि. १२/०१/२०२० यादिवशी वरकुटे यागावी मेंढजोगी श्री हरी विठोबा शिंदे (वरकुटे ता इंदापूर) यांची भेट घेतली.

भटकंती माध्यमातून लोकांशी संवाद साधताना व कुटुंबातील नेहमी "मेंढजोगी" आपल्या घरी येत असे, मेंढा चे पुजन करीत असे व घरातील सर्वांची नोंद करुन ठेवत होते हे फक्त ऐकून होतो. आज प्रत्यक्षात शिंदेना संपर्क करुन जाण्याचा योग आला, आम्ही संपर्क करुन पुणे-सोलापूर हायवे ने लोणीदेवकर पासून निमगाव केतकी याठिकाणी शिंदे थांबले होते आजींसोबत बाजाराला आले होते त्यांच्याकडे लुना गाडी होती. ४ कि.मी. प्रवास होता मग शिंदे मामा व आजींना आमच्या फोर व्हिलर मध्ये बसविले. पञकार खोरकर व श्रीकांत हंडाळ यांचा लुना गाडीवर बसून वरकुटे यागावी लुनावरचा प्रवास हा अविस्मरणीय होता.

शिंदे यांच्या घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर शिंदे मामा यांनी मेंढा आमच्या समोर ठेवला. थोडक्यात वर्णन म्हणजे मेंढा व त्याच्या पुढील पायांशेजारी श्री बिरोबा, धुळोबा मध्यभागी महादेवाची पिंड होती. मेंढ्याच्या चार पायांच्या मध्यभागी लांडगा त्याच्या तोंडामध्ये बकर होते, शेजारी कुञा, मेंढा होता. मेंढ्यासमोर श्री खंडोबा व बानुबाई ठेवली होती, हे सर्व ऐकून होतो पण प्रत्यक्षात पाहूण अभिमान वाटला आपल्या पुर्वजांच्या नोंदी डायरीमध्ये ठेवण्यात आल्या असून सध्या फोटो सहित माहिती व मोबाईल नंबर व लिहिणार्‍यांची सहीची नोंद ठेवली जात आहे. अनेक आडनावे टोपन नावावरुन, अनेक प्रसंगावरुन पडलेले आहेत (उदा: गोफण फिरविणारे गोफणे) त्यामूळे मुळ नाव शोधण्यासाठी घरातील जेष्ठ व्यक्तींशी नवीन पिढीने संवाद साधने गरजेचे वाटते. जे अनेक पिढ्यांनी सांगितलेली माहिती मेंढजोगी जतन करीत आहेत. तसेच आम्हाला शिंदे नी कुळाची माहिती दिली यामधील एक उदाहरण हंडाळ कुळभावकीचे पाहूयात..

(हंडाळ यांची कुळ भावकी : हळनवर, येळे, बाचकर, होलगुंडे, दिमगुंडे, सरवदे, कुंडलकर, हंडाळ, डुबे, शिदगुरु, बजांगे, कोल्हटकर)

हंडाळ यांची वरील आडनावाच्या भावकी असल्याने लग्नाच्या सोयरीकी होत नाहीत. पण जुनी लोक हे सर्व जतन करीत होती, सध्या माॅडर्न जमान्यात युवा पिढी धावपळीच्या युगात अज्ञानामुळे, माहिती नसल्यामुळे ऐकमेकांमध्ये सोयरीकी होत आहेत. शिंदे मामांकडून बरीच माहिती दौंड तालुक्यातील डायरीमध्ये लिहलेली पहायला मिळाली, पुर्वीपासूनच्या एकाच घरातील सिरयली वंशावळ पहावयास मिळाल्या नाहीत पण डायरीमध्ये वेगवेगळ्या पानांवर लिहल्या आहेत. हे वंशावळ जतन करण्याचे कार्य अनेक पिढ्यांपासून हे कार्य चालूच राहिल.

पुन्हा एक दिवस जाऊन व्यवस्थित माहितीसाठी जाणार आहे. मेंढजोगी हे पुर्वी बाहेरगावी वंशावळ जतन करण्यासाठी सायकल वरुन गावोगावी प्रवास करीत होते सध्या दुचाकी वरुन जात आहेत. जुन्या रुढी, परंपरा जतन होणे गरजेच आहे यासाठी आज घेतलेला छोटासा अनुभव सर्वांशी शेयर करीत आहेत.

श्री आण्णा शिंदे ९१४६७९५४८३
श्री हरी शिंदे ९९७०१६०४५६
श्री वाल्मिक शिंदे ९३०९७५८५०९

शब्दांकन: श्रीकांत हंडाळ (केडगाव ता. दौंड)

Комментарии

Информация по комментариям в разработке