BJP च्या Raju Shinde यांचा Uddhav Thackeray गटात प्रवेश, Sambhajinagar मध्ये BJP ला तोटा ? ताकद किती

Описание к видео BJP च्या Raju Shinde यांचा Uddhav Thackeray गटात प्रवेश, Sambhajinagar मध्ये BJP ला तोटा ? ताकद किती

#BolBhidu #RajuShindeBJP #UddhavThackeray

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली. लोकसभेत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळं एकंदरीतच मराठवाड्यात भाजपला कमबॅक करण्याची गरज असताना आता संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी ५ जुलैला भाजपमधून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत इतर ८ नगरसेवक आणि भाजपचे २० ते २५ पदाधिकारी देखील ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजू शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडालीय. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि भाजपमध्येच रहावं, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. राजू शिंदेंना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा बड्या नेत्यांनी फिल्डींगही लावली होती. पण राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम आहेत. आज ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण एका माणसाला रोखण्यासाठी भाजपने इतके प्रयत्न का केले ? राजू शिंदे नक्की कोण आहेत? ते पक्षासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке