Parli Vidhansabha: Dhananjay Munde यांना Sharad Pawar आणि Manoj Jarange यांच्यामुळे निवडणुक अवघड ?

Описание к видео Parli Vidhansabha: Dhananjay Munde यांना Sharad Pawar आणि Manoj Jarange यांच्यामुळे निवडणुक अवघड ?

#BolBhidu #DhananjayMunde #PankajaMunde

लोकसभेत माझी इज्जत ६ हजार मतांनी गेली आहे. काळजाला झालेली ही जखम खूप खोलवर आहे. ही जखम अजून भरलेली नाही. आता माहीत नाही या वेदना कधी थांबणार. मात्र विधानसभेतील मोठ्या विजयाने हे दुःख संपुष्टात येईल, हे शब्द आहेत, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे. ते बीडमधील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी उपस्थित होते. लोकसभेत पंकजा मुंडे यांचा ६ हजार मतांनी पराभव झाल्याचे दुःख मुंडे बहीण भावंडाना आहे. या पराभवाची सल अजूनही धनंजय मुंडेंना असून त्यांनी ती बोलून दाखवलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विधानसभेत आपला मोठा विजय होणार असल्याचे सांगून विरोधकांना एक प्रकारे चॅलेंज दिले आहे.

आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळीतही राजकीय समीकरणे बदलेलली आहेत. पक्ष फुटल्यानंतर शऱद पवारांनी मुंडेंवर कठोर टिका करत त्यांच्याविरोधात भुमिका घेतली होती. त्यामुळे आता परळीतून मुंडेंना हरवण्यासाठी पवारांसह महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशा परिस्थितीत मुंडेंना पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यातून निवडून येणं अवघड जाईल का, धनंजय मुंडे यांच्यासमोर परळीतून नेमकी काय आव्हानं असतील जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке