“चांदणे ते तेच मधुबन”- ज्याोती परांजपे, स्वरसाथ- श्री गोविंद पोवळे.

Описание к видео “चांदणे ते तेच मधुबन”- ज्याोती परांजपे, स्वरसाथ- श्री गोविंद पोवळे.

संगीतकार- दशरथ पुजारी
कवी- यशोदकुमार गवळणकर
दशरथ पुजारी यांनी “चांदणे ते तेच मधुबन” ह्या गाण्याकरता जी चाल तयार केली होती ती मग त्यांनी “रात्र आहे पौर्णिमेची” ह्या गाण्याला दिली.
Lyrics-
चांदणे ते तेच मधूबन, ती नीशा शरदातली
संगतीला नाही कान्हा, आज राधा एकली॥

स्तब्धला का गंध वाही, कुंदल्या दाही दिशा
रास नाही आज येथे , रागिणी ना गोडशा
आवरूनी साज सारा ,रातराणी झोपली ॥१॥

नाही जमल्या गोपबाळी, अंग जाळी चांदणे
नाही किणकिण मेखलांची, नादती ना पैंजणे
खळखळेना धुंद यमूना , का अशी मंदावली॥२॥

नाही घुमतो गोड पावा ,आज रूसला श्रीहरी
साहवेना विरह आता राधिका ही बावरी
कृष्णलीला आठविता शाम रंगी रंगली ॥३॥

Комментарии

Информация по комментариям в разработке