Dr. Gowriu Kulkarni - MBBS, MRCGP (BACP) Family medicine specialist
Talk to a Doctor Now: https://doctor.app/youtube/bengali
Play Store: https://play.google.com/store/apps/de...
App Store: https://apps.apple.com/in/app/docsapp...
उच्च रक्तदाब (हाय बीपी) असण्याची कारणे आणि उपचार काय आहेत?
उच्च रक्तदाबाची बरीच कारणे असू शकतात, जसे की, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल तसेच लिव्हर आणि किडनी यांच्यातील बिघाड इत्यादी. उपचारांमध्ये प्रथम जीवनशैलीतील बदल महत्वाचा आहे. औषधांसोबतच नियमित व्यायाम, आहारात कमी मीठ, तणाव कमी करणे गरजेचे आहे. जर आपणास जास्त बीपीचे निदान झाले असेल तर, नियमित डॉक्टरांना भेटणे, वेळोवेळी रक्तदाब मोजणे,व औषधे घेणे आवश्यक आहे.
कारणे: बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल प्रॉब्लेम्स
उपचार:जीवनशैलीत बदल,आहारात कमी मीठ घेणे, नियमित व्यायाम, तणाव कमी करणे
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचे निदान झाले असेल तर, नियमित तपासण्या करा, नियमित बी.पी. मोजा , नियमित औषधोपचार घ्या.
More Info....
आपल्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये बऱ्याच जणांना आपण बीपी वाढले आहे किंवा बीपीचा त्रास आहे असे बोलताना अनेकदा ऐकतो. हा व्याधी जितक्या मोठ्या प्रमाणात आढळतो तितक्याच मोठ्या प्रमाणात तो घातक देखील आहे. बीपी वाढणे काही एका दिवसात निर्माण होत नाही, यामागे अनेक कारणे आहेत, आणि तुमची जीवनशैली म्हणेजच तुमच्या आहार विहाराच्या पद्धती हे मुख्य कारण आहे. तळलेले पदार्थ जास्त खाणे, वजन वाढणे, व्यायाम न करणे, अतिरिक्त तणाव, वाढते वय म्हणजेच वृद्ध वय, अनुवंशिकता या सर्वांमुळे बीपी वाढते, तसेच जेव्हा तुमचे बीपी वाढलेले असते तेव्हा बऱ्याचदा तुमच्या रक्तातील चरबी म्हणजेच कोलेस्टेरॉल सुद्धा वाढलेली असते.
बीपी वाढणे म्हणेजच उच्च रक्तदाब म्हणेज तरी काय? उच्चं रक्तदाब म्हणजे रक्ताचा रक्तवाहिन्यांवरील दाब वाढणे, सामान्यतः म्हणजेच नॉर्मल रक्दाब हा १२०/८० एमएम मर्क्युरी एवढा असतो, तो जर १३०/९० पेक्षा जास्त असेल तर त्यास उच्च रक्तदाब असे म्हणतात. दीर्घकालीन उच्च रक्दाब हा तुमच्या शरीरातील महत्वाच्या अवयवांना इजा पोहचवतो. याचा सर्वात जास्त धोका हा हृदय, किडनी यांना होतो, तसेच लिव्हर मेंदू यांच्यावर देखील होतो.
यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या आहार विहारात योग्य तो बदल करायला हवा, आहारात कमी मीठ, कमी स्निग्ध पदार्थ , तसेच तणाव कमी करणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
वेळोवेळी रक्तदाब मोजणे व डॉक्टरांना नियमित भेटून औषधे घेणे आवश्यक आहे. तुम्ही केव्हाही ऑनलाइन डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घेऊ शकता.
#highbloodpressure #hypertension #vajankamikarne #bipi #talktodoctor #online doctor #doctornearme #docsapptv #DocsAppTv #DocsAppDoctors #BaatTohKaro
Follow us on:
Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s
Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV
Информация по комментариям в разработке