भारताचा भूगोल - स्थान व विस्तार - नकाशातून Tricks ने तोंडपाठ!! Geography of India

Описание к видео भारताचा भूगोल - स्थान व विस्तार - नकाशातून Tricks ने तोंडपाठ!! Geography of India

Location of India
Extention of India
Area of India
Neighbouring countries of India
भारताचा मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार 8° 4′ 28” उत्तर ते 37° 6′ 53′ ‘उत्तर असा आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 29° 2’ 25” इतका आहे. भारताच्या अति दक्षिणेकडे इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावरील ठिकाण असून ते 60° 45′ 15” उत्तर अक्षवृत्तावर आहे. अक्षवृत्तीय विचाराचा प्रभाव तापमान, पर्जन्य दिवस-रात्रीच्या कालावधीवर पडतो.

भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68° 7′ 33” पूर्व ते 97° 24′ 47” पूर्व इतका आहे त्यानुसार भारताचा रेखावृत्तीय विस्तार 29° 17′ 14” इतका आहे.

रेखावृत्तीय विस्तारामुळे सुर्योदय, सुर्यास्त व स्थानिक वेळ इत्यादी ठरतात.

भारताची प्रमाणवेळ 80° 30′ पूर्व रेखावृत्तावर आहे ती उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरावर निश्चित करण्यात आलेली आहे. हे रेखावृत्त भारताच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांतून जाते. या रेखावृत्त मुळे भारताचे दोन समान भाग पडतात. पूर्व भारत व पश्चिम भारत. तसेच भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त 23° 30′ उत्तर हे अक्षवृत्त पूर्व -पश्चिम दिशेने जाते. यामुळे भारताचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन समान भाग पडतात. हे अक्षवृत्त भारताच्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यांतून जाते.

Комментарии

Информация по комментариям в разработке