पुण्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी आवश्यक तरतुद | मुंबई | DCM Devendra Fadnavis

Описание к видео पुण्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी आवश्यक तरतुद | मुंबई | DCM Devendra Fadnavis

पुण्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी आवश्यक तरतुद | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(विधानसभा लक्षवेधी । बुधवार, दि. 3 जुलै 2024)

00:00 - पुण्याच्या पाणी समस्येबाबत चर्चा
राज्यातील सर्व शहरी भागात प्रतिमाणसी 150 लिटर पाणी पुरवण्याचा निकष. पुणे शहरात लोकसंख्या 23 गावांसह 72 लाख लोकसंख्या गृहित. त्यानुसार आवश्यक प्रतिमाणसी 150 लिटर पाणी.

01:10 - पुण्याला तरतुदीपेक्षा दुप्पट पाणी
पुण्यात पाण्याची तरतूद 11.60 टीएमसी. तर 14.61 टीएमसी पाण्याची मंजुरी. त्यानुसार 3 टीएमसी जास्त पाणी. मात्र, पुण्यात पाण्याचा वापर 20.78 टीएमसी. तरतूदीच्या दुप्पट पाण्याचा वापर.

02:03 - पुण्यासाठी 24*7 किंवा समान पाणी वाटप योजना
पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता 12.82 टीएमसीची असली पाहिजे, तर 20.78 टीएमसी पाण्याचा वापर. मोठ्या प्रमाणात गळती.

02:43 - पाण्याची बचत गरजेची
अनअकाऊंटेड पाणी 40% असेल तर पाण्याची बचत केली पाहिजे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही पाण्याची मागणी. पाण्याचा थेंब अन् थेंब महत्त्वाचा म्हणून योजना. समान पाणी वाटप योजनेचा कालावधी साधारण 8 वर्ष. पुण्यात अनेक ठिकाणी हे काम पूर्ण.

04:06 - पुण्यात जवळपास 40% झोनमधले काम पूर्ण. 20 टीएमसी पाण्यात 20% बचत केली तर 4 टीएमसी पाणी बचतीतून उपलब्ध होईल.

04:52 - खडकवासला ते फुरसुंगी टनेल करणार. त्यामुळे 2 टीएमसी पाणी उपलब्ध होणार. सर्व योजना मिळून 5 टीएमसी पाणी उपलब्ध होणार.

05:40 - पुण्याला आवश्यक पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध
पुण्यात एसटीपीमुळे ट्रीटेड वॉटर इंडस्ट्रीला देणार.

06:41 - पाणी प्रदूषणाबाबत योजना करणेबाबत
पुण्यात समान पाणी पुरवठ्यासाठी नव्याने पाणी पुरवठा नियोजन योजना करावी लागणार. समान पाणी पुरवठ्यासाठी 40-50% काम पूर्ण. पाणीपुरवठा असमानता दूर करण्यासाठी प्रयत्नशील.

10:03 - ओपन कॅनलसंबंधी काम सुरु
ओपन कॅनलला बंदिस्त पाईपलाईनमध्ये परिवर्तित करण्याचा प्रकल्प मनपाच्या विचाराधीन. इरिगेशन विभागाकडून कारवाई सुरू.

10:27 - पायाण्याचे नवीन स्त्रोत, टाटा प्रकल्पातून 5 टीएमसी पाण्याच्या मागणीबाबत
पुण्यातील सर्व गावांना लक्षात घेऊन आराखडा तयार करणार. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लोसेस 40 वरुन 20 टक्क्यांवर आले. त्यामुळे ४ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार.

12:11 - एसटीपी योजनेमुळे पाण्याचा पुर्नवापर होणार. 5 टीएमसी पाणी अॅडिश्नल उपलब्ध करुन घेणार. टाटा प्रकल्पातील पाणी पिण्याकरता, इरिगेशनसाठी डायव्हर्ट करता येईल का याची पडताळणी करणार.

14:24 - पिण्याचे पाणी योजनेबाबत
सुर्वे समिती अहवाल प्राप्त. लवादाने दिलेल्या अटीशर्ती भंग झाल्यास पाणी कमी केले जाते. मात्र, ते पाणी पिण्याचे पाणी म्हणून वळवू शकतो का त्या दृष्टीने बैठक घेण्यात येईल.

16:37 - पुणे शहराच्या अॅडिश्नल पाण्यासंबंधी
जास्तीचे पाणी वापरले म्हणून कायद्यानुसार दंड लागतो, मात्र हा दंड वसूल केला नाही. जे घटक जास्त पाणी वापरतील त्यास दंड. कात्रजचे अर्धा टीएमसी पाणी वापरणे फिसिबल असल्यास विभागाने पडताळून पाहण्याचे आदेश

18:31 - रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि नैसर्गिक स्त्रोताबाबत
पाण्याचे नवे स्रोत नव्याने निर्माण करता येत नसल्याने पाणी बचतीशिवाय पर्याय नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग पॉलिसी स्ट्रिकली इम्प्लिमेंट होत आहे का याची चाचपणी करण्याबाबत मनपाला सूचना.

20:55 - ज्या भागात पाणी पोहचत नाही तिथे टँकरने पाणी पोहचवण्याबाबत
ज्या भागात पाणी पोहचत नाही तिथे टँकरने पाणी पोहचवण्यासंबंधी मनपाला सूचना. समान पाणीपुरवठा धर्तीवरच 34 गावांमध्ये योजना करणार.

22:34 - पुण्यातील एसटीपी योजनेबाबत
पुण्यात एसटीपीसाठी प्रक्रिया सुरु. पुण्यात एसटीपीसाठी जायकाकडे योजना पाठवली. पुढच्या 3-4 वर्षात एसटीपी तयार होणार.

24:42 - वाघोलीत पाणी नियोजन आणि टॅक्ससंबंधी चर्चा
पाणी नियोजनाबाबत जनगणनेनुसार प्रोजेक्शन केले जाते. वाघोलीबाबत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न.

26:25 - टाटा प्रकल्पातील पाण्याबाबत
टाटा प्रकल्पासंदर्भात अहवाल उपलब्ध. त्यानुसार कायदेशीर अडचणी दूर करण्याचा प्रयत्न.

27:49 - रिव्हर ऑस्मॉसिस तंत्रज्ञानाच्या वापराबाबत
रिव्हर ऑस्मॉसिस तंत्रज्ञानामुळे पाण्याचा जास्त अपव्यय. नवीन तंत्रज्ञानानुसार पाणी वेस्टेजचा रेशियो कमी करण्याचा प्रयत्न करू.

28:46 - पाणी व्यवस्थापन जबाबदारीबाबत...
पाणी पुरवठ्यासाठी नगरविकास विभागाला अल्टरनेट पाण्याच्या व्यवस्थेबाबत सूचना. नवीन हाऊसिंग सोसायटीमध्ये घनकचरा, सांडपाणी नियोजनाबाबत नियम करण्याबाबत सूचना.
#MonsoonSession2024 #Water#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке