पारंपारिक करंजी/कानवले- स्वादिष्ट, खुसखुशीत करंजीची रेसिपी डीप फ्राय,एअर फ्राय,बेक करु शकतो-ऑइल फ्री

Описание к видео पारंपारिक करंजी/कानवले- स्वादिष्ट, खुसखुशीत करंजीची रेसिपी डीप फ्राय,एअर फ्राय,बेक करु शकतो-ऑइल फ्री

English :    • Traditional Karanji/gujiya- Tasty,cri...  
Hindi :    • पारंपरिक करंजी/गुजिया- स्वादिष्ट,खस्त...  

पारंपारिक करंजी (कानवले)

क्विझिन : इंडियन, महाराष्ट्रीयन
कोर्स : स्नॅक, मिठाई
आहार : व्हेज

तयारीची वेळ : २० मिनिटे
स्वयंपाक वेळ : २० मिनिटे
पूर्ण वेळ : ४० मिनिटे

सर्व्हिंग्ज : २०
पोषण माहिती (केवळ अंदाज)
१५० कॅलरी प्रत्येक सर्व्हिंग

साहित्य :

करंजीच्या सारणासाठी :
१ टेस्पून - तूप
३ टेस्पून - चिरलेले बदाम
३ टेस्पून - चिरलेले काजू
१ टेस्पून - चिरलेले पिस्ता
१/४ कप - मनुका
१ टेस्पून - चारोळी
१ कप - किसलेले सुके खोबरे
१/४ कप - रवा
१ टेस्पून - खसखस
चिमूटभर मीठ
१ कप - पिठीसाखर (आवश्यकतेनुसार)
१ टीस्पून - वेलची पावडर

करंजीच्या कणिक साठी :
१ कप - मैदा
चिमूटभर मीठ
१ टेस्पून - तूप
१/३ कप - पाणी
तळण्यासाठी तेल

कृती :

करंजीचे सारण बनवण्यासाठी :
मंद आचेवर तापलेल्या पॅनमध्ये, १ टेस्पून तूप घाला
३ टेस्पून चिरलेले बदाम घाला
त्यांचा रंग बदलेपर्यंत तळून घ्या
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
३ टेस्पून चिरलेले काजू घाला
सोनेरी होईपर्यंत तळा
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१ टेस्पून चिरलेले पिस्ता घाला
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१/४ कप मनुके घाला
त्यांचा रंग बदलून गोल होईपर्यंत तळून घ्या
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१ टेस्पून चारोळी घाला
सोनेरी होईपर्यंत तळा
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१ कप किसलेले सुके खोबरे
हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१/४ कप रवा घाला
हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
बाऊल मध्ये काढा आणि बाजूला ठेवा
१ टेस्पून खसखस ​​घाला
हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या
बाऊल मध्ये काढा
चांगले मिक्स करा
नारळाचे मिश्रण थंड होऊ द्या
१ कप पिठीसाखर घाला
चिमूटभर मीठ घाला
१ टीस्पून वेलची पावडर घाला
चांगले मिक्स करा
सुक्या खोबऱ्याच्या मिश्रणात तळलेला सुकामेवा घाला
चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा

करंजीचे कणिक बनवण्यासाठी :
मिक्सिंग बाऊलमध्ये, १ कप मैदा घाला
चिमूटभर मीठ घाला
चांगले मिक्स करा
१ टेस्पून तूप घाला
चांगले मिक्स करा आणि तूप सर्व पीठाला चोळा
(पीठ मुठीमध्ये एकत्र होईपर्यंत मिक्स करा)
हळूहळू १/३ कप पाणी घाला
मध्यमसर घट्ट कणिक मळून घ्या
३० मिनिटे झाकून बाजूला ठेवा

करंजी बनवण्यासाठी :
३० मिनिटांनंतर
कणिक मळून घ्या
कणिक दोन भागात विभागून घ्या
अर्धे कणिक घ्या
कणकेचा लांब रोल बनवा
रोल समान भागांमध्ये कट करा
कणकेचे एक सारखे गोळे बनवा आणि त्यांना सपाट करा
झाकून बाजूला ठेवा
कणकेचा गोळा घेऊन पातळ (पुरीसारखा) लाटा
मध्यभागी सारण घाला
दोन्ही कडा एकत्र आणा आणि कडा दाबा
करंजी/पिझ्झा कटरने कट करा
करंजी प्लेटमध्ये ठेवा
पुरी लाटा
मध्यभागी सारण घाला
कडा दाबा
कडा दुमडून घ्या
करंजी प्लेटमध्ये ठेवा
पुरी लाटा
मध्यभागी सारण घाला
कडा दाबा
काटा चमच्याने कडा दाबा
करंजी प्लेटमध्ये ठेवा
(संपूर्ण मिश्रण संपेपर्यंत करंजी बनवण्याची प्रक्रिया पुन्हा करा)

करंजी बेक करण्यासाठी (ऑइल फ्री) :
बेकिंग ट्रे ला बटर पेपर लावा आणि करंजी ट्रे मध्ये ठेवा
वितळलेल्या तुपाने करंजीला ब्रश करा
३५०° फॅ (१७६° से) वर १५ मिनिटे बेक करा
१० मिनिटांनंतर
ओव्हनमधून ट्रे काढा
करंजी पलटी करा
वितळलेल्या तुपाने करंजीला ब्रश करा
५ मिनिटे बेकिंग पुन्हा सुरू करा
५ मिनिटांनंतर
ओव्हनमधून ट्रे काढा
(सोनेरी रंगाची होईपर्यंत बेक करा)
करंजी प्लेटमध्ये काढा
बेक केलेली करंजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

करंजी एअर फ्राय करण्यासाठी (ऑइल फ्री) :
करंजी बास्केट मध्ये ठेवा
वितळलेल्या तुपाने करंजीला ब्रश करा
करंजी ३५०° फॅ (१७६° से) वर १२ मिनिटे एअर फ्राय करा
८ मिनिटांनंतर
एअर फ्रायर मधून बास्केट काढा
करंजी पलटी करा
वितळलेल्या तुपाने करंजीला ब्रश करा
४ मिनिटांसाठी एअर फ्रायिंग पुन्हा सुरू करा
४ मिनिटांनंतर
एअर फ्रायर मधून बास्केट काढा
(सोनेरी रंगाची होईपर्यंत एअर फ्राय करा)
करंजी प्लेटमध्ये काढा
एअर फ्राय केलेली करंजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

करंजी तळण्यासाठी:
मध्यम आचेवर तापलेल्या तेलामध्ये, हलक्या हाताने करंजी सोडा
तेलात बुडबुडे कमी होईपर्यंत तळा
सोनेरी होईपर्यंत तळा
जास्तीचे तेल काढून टाका
किचन पेपर टॉवेल वर काढा
(सर्व करंजी तळेपर्यंत करंजी तळण्याची प्रक्रिया पुन्हा करा)
पारंपारिक करंजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке