वास्तुशांती का करावी.?

Описание к видео वास्तुशांती का करावी.?

वास्तू शांती विधान

©महाजन गुरुजी
वास्तुशांती का करावी? याचे विधान काय आहे ते पाहू

लग्न पहावं करुन, घर पहावं बांधून ही एक प्रचलित म्हण आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तू हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला. वास म्हणजे राहणे. राहण्यायोग्य वास्तू कशी असावी हे आपण वास्तुशास्त्र प्रकरणात पाहू.

वास्तू शब्दाचा अर्थ:-
©Mahajan guruji

मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवासासाठी सुरक्षित घर. वरील तीनपैकी घर ही महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावे, याचाही विचार आपण केला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचे एकच स्वप्न असते. आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज इत्यादि मिळूनही आपल्या घराचे स्वप्न साकार होतेच असे नाही. ते स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते. ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु लाभ पहातात.
दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यति असाच असतो. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजार हे घेतात. मग आपणास शंका येते की, आपल्या या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का? आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की, आपण आपल्या वास्तुची शांती केली नाही. ©Mahajan guruji
श्री महादेवने वास्तु पुरुषाला असा आशिर्वाद दिला जो कोणी नविन वास्तु निर्माण करेल त्या वास्तुची वास्तुशांती करणार नाही तो या वास्तुचा आहार बनेल व ती वास्तु स्मशानभूमी बनेल व वास्तुमुळे त्रास होईल असा आशिर्वाद प्राप्त झाला.

या सोबत जो मनुष्य नविन वास्तु निर्माण करतो तेव्हा त्या वास्तु भुमिच्या सप्त पाताळ नावे पुढील प्रमाणे 1:अतल, 2: वितल, 3: सुतल, 4:तलातल, 5: महातल, 6: रसातल,
7: पाताळ या सप्त पाताळ स्थित वास्तु भुमी खाली दोष
आहेत ते दोष परिहार करण्यासाठी व या भुमी वर जेव्हा आपण वास्तु निर्माण करतो तेव्हा लोखंड कुठून येते, विटा कुठून येतात, रेती नदीतुन येते(नदी अनेक मृतां जनांचा अस्थि विसर्जन केलेले असते) या द्वारे ह्या वस्तू आपल्या वास्तु निर्माण करण्यात साह्य करतात व वास्तु निर्माण करतात अनेक सुक्ष्म जीव मारले जातात या सर्वाचे दोष वास्तुच्या मालकाला लागतात.
या सोबत हे सर्व दोष वास्तुही (घराला) लागतात हे दोष परिहार जाण्यासाठी वास्तुशांती पुजन करतात
©Mahajan guruji




की प्रत्यक्ष वास्तुशांती पुजा कशी केली जाते आणि त्यासाठीचे विधान काय आहे कुठल्या गोष्टींचे पथ्य पूजना पूर्वी पाळायचे असते।
लेख क्रमांक एक मध्ये आपण वास्तू शब्दाचा अर्थ....?वास्तुपुरुषाची उत्पत्ती...? वास्तुशांती करण्याचे फायदे...? तसेच वास्तुशांती न केल्यास होणारे परिणाम ....?
यांची माहिती समजून घेतली.

महाजन गुरुजी या फेसबुक पेजवर आपण वास्तुशांती विधान या मालिकेतील तीन लेखांपैकी पहिला लेख नक्कीच वाचला असेल.

आता दुसऱ्या लेखांमध्ये आपण प्रत्यक्ष वास्तुशांती पुजा कशी करावी हे पाहणार आहोत.

कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु घेतल्यास वास्तु शांति करवी एकदा वास्तु शांती केल्यावर हा श्रीवास्तु देव आपले रक्षण करतो

पण त्याप्रमाणे आपण आर्थिक जुळवाजुळव करुन मनापासून ती तयार करतो. मात्र निवास करण्यापूर्वी वास्तुशांती नावाचा विधी करण्यास विसरतो किंवा सोयीस्कररित्या टाळतो. त्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे असतात.

एक ना अनेक कारणं आपल्याकडे असतात. जी वास्तू तयार करताना रंगरंगोटी, इंटेरियर, फर्निचर यासाठी आपण जितकी काळजी घेतो, जेवढे सजग आपण असतो, तितकेच आपण वास्तुषांती विधी करण्याबाबत निरिच्छ व उदासीन असतो.

मग वास्तुशांती केव्हा व कशी करावी? यातील मुख्य विधी कोणते?

Комментарии

Информация по комментариям в разработке