जिलानी बाबा दयाघना रे Jilani baba dayaghana re

Описание к видео जिलानी बाबा दयाघना रे Jilani baba dayaghana re

वंदनीय श्री सद्गुरूनाथ दादा (भागवत)
Vandaniy shri Sadgurunath Dada (Bhagwat)

जिलानी बाबा दयाघना रे, नमन करी मी तुला प्रभू रे।।धृ.।।।
समिती कार्य तू हाती घेतले, सकल जना शिस्तीत बसविले
आजवरी हे कधी ना घडले, धाक पडे सकला ।।१।।
"कामकाजास्तव जरी येणे, आरतीपूर्वी हजर रहाणे
पान सुपारी विडा ठेवणे", शिकविसी हे सकला ।।२।।
जरी का होई उशीर कुणाला, शिस्तबोध तो देसी तयाला
भयभीत मग सगळे झाले, सुचे न कवणाला ।।३।।
मलंगबाबा परतुनी येती, शांतवृत्तीने सकला वदती
"भिऊ नका परि शिस्तीत वागुनी, मिळवा ज्ञानाला" ।।४।।
"महंमद जिलानी ज्ञानी असती, विभूती तयांना श्रेष्ठ मानिती
शिस्तीमध्ये तुम्ही राहता, प्रेम मिळे सकला ।।५।।
सकल लोक मग अनुभव घेती, शिस्तीमध्ये सदा बैसती
प्रेम तुझे मग मिळते भक्ता, उपमा नच त्याला ।।६।।
भक्ताला गुरुमार्गी करण्या, बोधाची हातोटी तुजला
हासत खेळत ज्ञानही देसी, अमोल आम्हाला ।।७।।
बहुरंगी त्या नकला करिसी, मुलाखतीला मौज आणिसी
परमार्थाची गोडी लाविसी, सकलचि भक्ताला ।।८।।
नानापरीची निराकरण ती, संवेदन अन् सिद्ध पद्धती
कुबेर जणू तू या शास्त्राचा, ठेवा करिसी खुला ।।९।।
विमोचने ती सोपी जाहली, प्रार्थनत तू बद्धही केली
कारण नुरले कर्ममुक्तते, तीर्थे जाण्याला ।।१०।।
शिस्तबद्ध परमार्थही केला, आरती आणिक मुलाखतीला
आहारशास्त्र नि अल्पबचत ती, बोध प्रपंचाला ।।११।।
शनिवारी तू वर्ग ही घेसी, सान बालका ज्ञानही देसी
“समिती सेवक बनतील हेचि", सांगसी तू सकला ।।१२।।
मुलाखतीचा विषय तू घेसी, मन नि विचारावर भर देसी
"योग्य विचारामधुनी मिळते, शांती स्वमनाला" ।।१३।।
संकटात मन शांत ठेवणे, आत्मघात कधीही नच करणे
जरी का केला भोग भोगणे, पुढीलचि जन्माला ।।१४।।
"विचारांवरी लगाम लावा, मनःशांती मग सदैव मिळवा"
अनुभवातुनी बोल तुझे हे, पटले जनतेला ।।१५।।
मुलाखतीचा विषय संपता, घरी ना जाता तिथे थांबता ।।
गप्पागोष्टीत वेळ दवडिता, नच रुचते तुजला ।।१६।।
सकल भक्तजन शिस्तचि शिकले, त्यायोगे तव प्रेम लाभले
शतशः प्रणाम करिते परि नच, समाधान मजला ।।१७।।

Комментарии

Информация по комментариям в разработке