Mumbai ते कोकण प्रवास / कौकण tour part 1 / enjoyment

Описание к видео Mumbai ते कोकण प्रवास / कौकण tour part 1 / enjoyment

#Kokan #bhor #rajwada
#prathameshrasalvlog #malvan #sindhudurg #vloging #riding
#indiasroadways #india #roadlife
#indiasroad #Prathameshrasalvlog
#prathamesh_rasal_vlog #bhatkantiekpravas #रहस्यमय इतिहास
#bhatkanti #trekking
#sahyadri
#दुर्गभटकंती
#marathas 🚩
#HistoryMakers 🐾
#dongryatra
#memoriesneverdie
#marathaempire
#footprintofhistory
#marathivloger
#kokanibala
#KBvlog

कोकण
भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.



कोकणाला संस्कृतमध्ये अपरान्त म्हणतात.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली [१] अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत [२] व केरळ मधील नंबुद्री [३] ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे.


कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे

कोकणाला 720 कि.मी चा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी (२३७) रायगड (१२२) सिंधुदुर्ग (१२०) ठाणे व पालघर (१२७) मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.

कोकण प्रदेशाला तीन राज्याच्या सीमा लागून आहेत.गोवा कर्नाटक आणि गुजरात ही राज्य आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ चौ.कि.मी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ चौ.कि.मी आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ चौ.कि.मी आहे.

कोकणातील सागरी किल्ले-

वसईचा किल्ला,जंजिरा,विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत.

कोकणातील बेटे

मुंबई ,साष्टी ,खांदेरी, उंदेरी, अंजदीव जंजिरा घारापुरी कुरटे इ.बेटे कोकणात समाविष्ट होतात .

कोकणातील खाड्या - उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे.

कोकणातील बंदरे महाराष्ट्रात एकूण ४९ बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे अलिबाग मुरुड श्रीवर्धन जयगड रत्नागिरी मालवण आणि वेंगुर्ला


*थंड हवेची ठिकाणे *
1)माथेरान
2)आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)
3)जव्हार
4)दापोली (मिनी महाबळेश्वर )


भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.

संस्थानांत विचित्रगड तालुक्यांत रोहिडा, राजगडांत राजगड, प्रचंडगडांत प्रचंडगड (तोरणा), पौनमावळांत तुंग व तिकोना आणि सुधागडांत भोरप व सरसगड असे एकंदर ७ किल्ले आहेत. बहुतेक किल्ले इतिहासप्रसिद्धच आहेत. राजगडाची बांधणी प्रेक्षणीय आहे. प्रचंडगड हा सर्व किल्ल्यांत उंच आहे. भोरापासून दक्षिणेस सुमारें ८ मैलांवर भोर व वाई यांच्या दरम्यान अंबाडखिंड उर्फ विश्रामघाट येथें संस्थानची धर्मशाळा, वाडा व अन्नसत्र आहे. येथील हवा पांचगणीसारखी थंड आहे. भोरच्या आग्नेय दिशेस अंबवडे येथें शंकराजी नारायण (पंतसचीव घराण्याचा मूळपुरूष) यांची समाधि आहे. राजगड तालुक्यांत बनेश्वर, विचित्रगडांत रायरेश्वर व सुधागडांत उन्हाळे हीं स्थळें पहाण्यासारखीं आहेत.


तर मित्राने video कसा वाटला comment मध्ये नक्की कळवा अन video आवडल्यास like share subscribe नक्की करा


IF YOU LIKE MY VIDEOS, SUBSCRIBE MY CHANNEL⬇️
   / @kokani_bala5936  
●▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●

Follow me on social media
Facebook⬇️   / prathamesh.rasal.94  
Instagram⬇️
  / prathamesh_rasal_vlog  
●▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●
My vlogging gears:
Mic:http://dl.flipkart.com
Tripod:http://dl.flipkart.com
action camera dji osmo

music by -    • Mariam - Mooroo [Official Music Video]   marr- plz susbscribe this channel.

तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा,शेअर करा आणि सबस्क्राईब करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке