मुरंजन गड | गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय |८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या पायऱ्या |

Описание к видео मुरंजन गड | गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय |८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या पायऱ्या |

शिलाहार_यादवांनी येथे लष्करी तळ उभारला. यादवांनी त्यावेळी या गडाला 'मुरंजन' असे नाव दिले होते.मुरंजन गड म्हणजे २३०० फूट उंचीचा सरळसोट डोंगरच आहे. त्यानंतर हा गड बहामनी राज्यकर्त्यांचया छत्राखाली आला. मग नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. सन १६३६ मध्ये मुरंजन गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. तेव्हा महाराजांनी किल्ल्याच आधीच नाव बदलून कलावंतीण दूर्ग असं ठेवलं.हा गड चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत पायऱ्या चढताना धरण्यासाठी कसलाच आधार नाही. त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली अ्थवा पाय घसरला तर खालच्या खोल दरीतच माणूस कोसळतो. या गडावर झालेले बहुतेक मृत्यू असेच झाले आहेत.
कलावंतीण गड हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे. पठारासारखा भाग आहे, ज्याला प्रबळमाची म्हणले जाते. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात कोरलली गणपतीची अन् हनुमंताच्या मूर्ती आहे.गडावर पाण्याची टाकी आहेत पण परंतु पाण्याच्या टाक्यांपर्यंत जाण्याची वाट सुद्धा अवघड आहे कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. गुहेत आत शिरताच वळणा-वळणाचा रस्ता पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली दिसते. गुहेतुन बाहेर आल्यावर तिथून पुढील वाट रुंद आणि घसरणीची असून दगडात तासलेल्या ८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक- दिड फूट उंच पायऱ्या आहेत. पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर पुढे कलावंतीणीचा अखेरचा २०_२५ फुटांचा "रॉकपॅच" आहे. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. मुंबई-पुणे हायवेवरून शेडुंग फाट्यापासून ठाकुरवाडी गावामध्ये यावे येथुनच गडाकडे जायचा मार्ग आहे

Комментарии

Информация по комментариям в разработке