Sunita Williams यांना परत आणण्यासाठी NASA Elon Musk यांच्या SpaceX ची मदत घेणार, मिशन कसं असणार ?

Описание к видео Sunita Williams यांना परत आणण्यासाठी NASA Elon Musk यांच्या SpaceX ची मदत घेणार, मिशन कसं असणार ?

#BolBhidu #SunitaWilliams #SpacexLaunchUpdates

भारतीय वंशाच्या अंतराळवीर अंतराळात अडकल्या, सुनीता विल्यम्स यांचं २०२४ वर्ष अंतराळात जाणार, गेल्या दोन महिन्यांपासून अशा बातम्या सातत्यानं येत आहेत. तिस-यांदा अंतराळवारी करत सुनीता विल्यम्स यांनी विक्रम केला. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर जून २०२४ मध्ये आठ दिवसांच्या स्पेस मिशनवर गेले होते. पण बोइंग स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळं तब्बल ८० दिवस हे दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकले आहेत. पण त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी आता एक योजना तयार करण्यात आलीय.

त्यासाठी नासानं एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीची मदत घ्यायचं ठरवलंय. फेब्रुवारी २०२५ मध्ये या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळं या दोघांची आठ दिवसांची अंतराळ मोहीम आता आठ महिन्यांची होणार आहे. पण नासाने या अंतराळवीरांना परत आणण्याच्या मोहिमेसाठी एलॉन मस्कच्या कंपनीचीच निवड का केली? या दोघांना परत आणण्यासाठी कसे प्रयत्न केले जाणार आहेत आणि या लांबलेल्या प्रवासात अंतराळवीर कसं सर्वाइव्ह करणार? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке