परात्म शिवाय गती नाही | सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला

Описание к видео परात्म शिवाय गती नाही | सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला

#रामगिरी महाराज #विचार #श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सराला #गोदावरीधाम #godavaridham #Godawaridham #Mahrashtradham #Dham #saralabet #sarala #god #vitthal #raindropphotography #ramgirimaharaj #gangagirimaharaj #prashantyemul #

योगीराज सद्गुरू श्रीगंगागिरी महाराज मध्ययुगीन आणि आधुनिक संत मालिकेस जोडणारे महान संत, योगी आणि श्रेष्ठ भगवत भक्त होते. त्यांनी कठोर साधना करून सद्गुरू कृपा, ईश्वर साक्षात्कार आणि अलौकिक सामर्थ्य प्राप्त केले होते. त्यानंतर त्यांनी समाजोद्धाराचे महान कार्य केले. त्यांचे ब्रीदवाक्य पुढीलप्रमाणे होते- लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान | तरणे को लिनता, डूबने को अभिमान || त्यांनी नामसप्ताहाच्या माध्यमातून समाजास नामसाधना, अन्नदान, दैवी सद्गुण आणि दुर्गुणांचा त्याग या गोष्टींची शिकवण दिली. याप्रमाणे कार्य करीत ते गोदावरी गंगेच्या मध्ये तयार झालेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे साधना करीत असत. पुढे ते सन १९०२साली तेथेच समाधिस्त झाले. त्यांचे कार्य त्यांचे शिष्य परंपरेतील महापुरुष आजही उत्तमप्रकारे अव्याहतपणे करीत आहे.
अशा संतांच्या विचाराचे आणि त्यांनी प्रवर्तित केलेल्या जीवन मूल्यांचे मोल आणि त्यांची आज आवश्यकता समाजास पटवून देणे. सुख, शांती आणि शाश्वत समाधानासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही, प्रेम, समता, ऐक्य, सर्वसमावेशकता इत्यादींची महता सांगणे. व्यसनमुक्ती, बंधुता, देशप्रेम, महिला सशक्तीकरण या कार्यासाठी प्रोत्साहन देणे. योग्य परंपरांचा सांभाळ करीत अनिष्ट रुढींची अनावश्यकता समजावून देणे. श्रीक्षेत्र सराला बेटाच्या माध्यमातून गुरुकुल, अन्नदान,गोसेवा, संतसेवा, उपयुक्त ग्रंथ प्रकाशन करणे.
या चॅनलच्या माध्यमातून अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सराला बेट पीठाधिश्वर श्रीगुरू महंत स्वामी रामगिरी महाराज वरील कार्य करीत आहे. ते कीर्तन- प्रवचनाद्वारे समाज प्रबोधन करतात. हा त्यांच्या कार्याचे प्रचार प्रसार करण्याचा अल्प प्रयत्न आहे.

#famus god in maharashtra #ahmednagargod #ahmednagar tourist places #best place in ahmednagar

Комментарии

Информация по комментариям в разработке