Bandravarche Aaj Sanala 2024 | New Fatima Mauli Feast Song.

Описание к видео Bandravarche Aaj Sanala 2024 | New Fatima Mauli Feast Song.

फातिमा माऊलीच्या सणानिमित्त व बंदरावरच्या सणानिमित्त सादर करत आहोत, मंत्रमुग्ध करणारे हे गीत, हे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

हे गाणे आवडल्यास काय करायचं आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे !!!
अभिप्राय कळवा COMMENT करून
आवड कळवा LIKE करून
इतरांपर्यंत पोहोचवा SHARE करून
व अशा सुमधुर गीतांसाठी सहमती कळवा SUBSCRIBE करून

फातिमा माऊलीच्या सणाचा किंवा बंदरावरच्या सणाचा इतिहास

पवित्र कुमारी मरीयेने फातिमा येथे तीन मुलांना दर्शन दिले व त्यांना उपकृत केले.
अगदी असाच इतिहास आहे फातिमा माऊलीच्या सणाचा किंवा बंदरावरच्या सणाचा.
दुःखाच्या व कसोटीच्या वेळेला आपली हाक असते ती आपल्या आईला कारण ती आपली मध्यस्थीनि माता असते, आणि हा आपला अनुभव आहे कि ती आपल्या प्रत्येकाच्या हाकेला धावून येते असते.
एका वर्षी पाऊस उशिरा सुरु झाला आणि मुबलक प्रमाणात नाही झाला आणि त्याच नंतर जेव्हा उन्हाळा सुरु झाला, तापमान वाढले, पण कोळी व्यवसायावर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली, अशावेळी जेव्हा हिंदू बांधवांनी मान देऊन, होम हवन करून त्यांच्या देवांकडे साकडे घातले, तेव्हा आपल्या धर्मगुरूंनी व समंजस वडीलधाऱ्यांनी फातिमा माउलीचे इमाज संपूर्ण बंदरावरून फिरविले आणि चित्र बदलले. माऊलीची पाऊले बंदरावर पडताच, सुगीचे दिवस परतले.
म्हणूनच माउलीचे आभार मानण्यासाठी त्याचेच प्रतीक म्हणून आपण फातिमा माऊलीचा सण, हा बंदरावरचा सण म्हणून दरवर्षी साजरा करत असतो. तिने केलेल्या मध्यस्थीने तिच्या दिव्य पुत्राद्वारे आपल्याला अनेक कृपादानांचा या वर्षभरात लाभ झाला आहे. त्याची जाणीव ठेवून कृतज्ञ अंतःकरणाने आपण आपल्या प्रिय मातेला मिरवणुकीने वाजत गाजत आपल्या बंदरावर आणून तिची स्तुती गातो व तिचा महिमा वर्णितो, व या वर्षभरातील मासेमारी हंगामासाठी, आपला उदरनिर्वाह झाल्याबद्दल, नौका व नाविक सुखरूप किनाऱ्याला आल्याबद्दल. जी कार्य पार पडली त्याबद्दल , चांगल्या आरोग्याबद्दल अशा असंख्य कला-गुणांसाठी, कृपादानांसाठी तिचे आभार मानतो. चला तर मग आज आपण जाऊया बंदरावरच्या सणाला आणि त्या मध्यस्थीनि मातेचा कृपाशीर्वाद घेऊया.

बंदरावरचे आज सनाला...
Composed by Satyam Suresh Koli

Lead Singer Arpan Arekar

Backing Vocals by Naresh Arekar, Swapnil Koli and Satyam Koli

Music production Sound Synth Studio, Arnala

Mix and mastered by Krupesh Koli

DOP Sai Koli (Saurabh)

Video Editing & Drone by Reynold Koli

Choreographed by Telfina Jambale

Dancing Crew
Velina Erangale
Namrata Erangale
Susmita Erangale
Reema Koli

Hair and Makeup
Nirmala Rodriques
Sonali Koli-Khanna

Special Thanks
Fr Sandeep Borges
Prem Sadan Sisters and girls
Parishioners of Our Lady of the Sea Church Madh Island
Residents of St Paul zone, Vanzre Gully and
St. Mother Teresa Zone, Dongar Pada
Daryamata Band Pathak
Madh Daryadeep Machchimaar Sahakari Santha
Ramesh Dhake (Divine Mercy Boat)
Edward Koli
Samidha Dennis Vasaikar
Jayden Jambale
Dennis Miranda
Bonaventure Ferreira
William Peter Koli
Roshan Anton Koli
St. Bonaventure High School, Teaching and non-teaching staff

Décor
Aby Charlie Dmello
Nick Peter Koli

Assistant Directors
Kingston Clifford Rodriques
Regan Melvin D'souza
Selma Lucas-Koli

आपल्याकडून लाभलेल्या भरभरून प्रेमाबद्दल, सहाय्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार व फातिमा माऊलीचं बसावं सदोदित तुमच्यावर, तुमच्या आरोग्यावर , तुमच्या कुटुंबावर व तुमच्या कामा धंद्यांवर राहो हीच प्रार्थना व सदिच्छा !!!

बंदरावरचे आज सनाला
जमलाय बघा यो लोक सारा
फातिमा माउलीचे दर्शनाला
हौशेशी येतंय यो गाव सारा

वाटत होतं या वरसाला
तोंड देवाला लागेल दुष्कालाला
उंद्या काय होल याचा नता पत्ता
बोटी लागल्या होत्या बंदराला

विश्वासाची होती परीक्षा
जाल्याला होती निराशा
हिमतीची होती मनीषा
मावले तुवच होती आमची आशा

पास्कूचा सन आमी गाजवितुस
लागल्या डोली आमच्या भराला
आयसच रेऊनदे तुझं बेसाव
अखेरिचे या महिन्याला

बंदरावरचे आज सनाला
जमलाय बघा यो लोक सारा
फातिमा माउलीचे दर्शनाला
हौशेशी येतंय यो गाव सारा

कोरेजमे न सन इस्टरचा
आटपिता आयला सन बंदरावरचा
सोला आपला दर वर्साचा
सन यो मोठा हाय कोल्यांचा

देवलांशी निंघू बॅण्ड वाजवित
लजार करीत न गाणी गाईत
मिरवित मिरवीत आपले माउलीला
हानु आपु तिला बंदराला

कृपा तुझी न तुझे पुत्राची
मिळूनदे आमा न या बंदराला
बरकत दे कामा धंद्याला
शांती सुलाय दे सगल्यांना

#FatimaMauli
#FeastSong
#DevotionalMusic
#MarathiMusic
#ReligiousSong
#CulturalCelebration
#SpiritualMusic
#TraditionalMelody
#FestivalVibes
#DivineMusic
#BandravarcheAajSanala
#BandravarchaSan
#2024trending
#CatholicSong
#MotherMary
#MadhIsland

Комментарии

Информация по комментариям в разработке