२० वर्षांनी आम्ही अनुभवले बालपणातील शालेय जीवन

Описание к видео २० वर्षांनी आम्ही अनुभवले बालपणातील शालेय जीवन

सध्याच्या धावपळीच्या जीवनातून थोडावेळ एकांतात गेल्यावर सर्वांनाच वाटतं की आपलं शाळेतील जीवन किती भारी होतं. अशाच या शाळेतील जीवनाचा अनुभव आम्ही तब्बल २० वर्षांनी अनुभव घेतला. आमच्या विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल या शाळेच्या इयत्ता दहावी, सन २००३-०४ बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा रविवारी, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला. शाळेच्या दिनक्रमाप्रमाणे सर्वांनी या स्नेहमेळाव्यास हजेरी लावली. दहावीच्या वर्गातील अ,ब, क, ड, ई अशा पाच तुकड्यांमधील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि ३५ पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांकडून एक लाख रुपयांची पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आली. यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी वीस वर्षानंतर खरोखर पुन्हा एकदा बालपणातले शालेय जीवन जगण्याचा अनुभव घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देत मुला-मुलींनी व शिक्षकांनी शालेय जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या. आज वीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत असल्याचे ऐकून सर्व शिक्षकांना वेगळेच समाधान मिळाले आणि त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. एकंदरीत कित्येक वर्षांनी शिक्षक तसेच मित्र- मैत्रीणींना भेटून खूप आनंद झाला. या स्नेहमेळाव्यातील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मी पार पाडली. सर्वांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे सर्वांना शालेय जीवनाचा पुन्हा एकदा अनुभव घेता आला.

#Wagholi #Pune #PMC #वाघोली #पुणे #माजीविद्यार्थीमेळावा #GetTogether #शाळा #school #स्नेहमेळावा

Комментарии

Информация по комментариям в разработке