पालेभाज्यांचे औषधी गुणधर्म हिरव्या पले भाज्याचे फायदे hirvi palebhaji

Описание к видео पालेभाज्यांचे औषधी गुणधर्म हिरव्या पले भाज्याचे फायदे hirvi palebhaji

हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.
भारतामध्ये विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या खाल्ल्या जातात, त्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहेत पालक, माठ, गोगू, मेथी, शेवग्याची पाने, पुदिना इत्यादी.
रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ठ करण्यामूळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो आणि उत्तम आरोग्याला चालना मिळते.सामान्यतः असं मानलं जातं की हिरव्या भाज्यांमुळं लहान मुलांना हगवण होते. त्यामुळं अनेक आया आपल्या मुलांना या पोषक अन्नापासून दूर ठेवतात. अनेक प्रकारचे जिवाणू / जंतू / किडे आणि इतर विचित्र पदार्थ हिरव्या भाज्यांना पाणी आणि मातीतून दूषित करतात. आणि त्या जर नीट धूऊन घेतल्या नाहीत तर खाल्ल्यानंतर हगवण लागू शकते. अशा प्रकारचे प्रदूषक काढून टाकण्यासाठी सर्व पालेभाज्या वाहत्या पाण्यात चांगल्या धुऊन घ्याव्यात आणि हगवण होणे टाळावे.

लहान बाळांना भाज्या ह्या शिजवून, कुस्करुन आणि गाळून घेऊन, जेणेकरुन त्यातला तंतूमय भाग निघून जाईल, मगच खायला द्याव्यात. हिरव्या भाज्यांचे पोषण मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, जादा किंवा अति प्रमाणात शिजवणे टाळावे, तसेच शिजवल्यानंतर या भाज्यांपासून मिळणारे पाणी फेकून देऊ नये. हिरव्या भाज्या ज्या भांड्यात शिजवल्या जातील त्यावर झाकण असेल याची काळजी घ्या. भाज्यांची पाने उन्हात सुकवू नका अन्यथा त्यातील कॅरोटीन नष्ट होईल. हिरव्या भाज्या तेलावर परतू नका.

हिरव्या भाज्यांचे पोषण मूल्य हे त्यांच्या किंमतीवर ठरवू नका. बहुतेक लोक तसं करतात आणि त्या दुय्यम महत्वाच्या असल्याचं समजून त्यांना टाळतात. हिरव्या भाज्या स्वस्त असल्या तरी, त्या अत्यंत पोषक असतात आणि सर्वांनाच आवश्यक असतात.

हिरव्या पालेभाज्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात यावे जेणेकरुन त्या वर्षभर उपलब्ध होतील. परसबाग, छतावरील बाग, शाळेतील बाग इत्यादी ठिकाणं ही हिरव्या पालेभाज्या उगवण्यासाठी आदर्श आहेत. शेवगा, अगाथी इत्यादी झाडांच्या हिरव्या पानांचा उपयोग हा ते झाड परसात लावलेले असेल तर फारसा प्रयत्न न करता नियमितपणे उपलब्ध होऊ शकतो.
हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोतदेखील आहेत.
भारतामध्ये पाच वर्षाखालील अंदाजे 30,000 बालकं अ जीवनसत्वाच्या अभावामूळे अंध बनतात. हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीन शरीरात परिवर्तित होऊन अ जीवनसत्व बनते जे अंधत्व टाळते.
हिरव्या भाज्यांमधील क जीवनसत्व टिकवून ठेवण्यासाठी, त्या अधिक काळपर्यंत शिजवू नयेत, कारण हे पोषक तत्व जे हिरड्यांना चांगल्या स्थितीत ठेवते, भाज्या अधिक काळ शिजवल्यास ते नष्ट होते.
हिरव्या भाज्यांमध्ये काही बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्वं देखील असतात.
#ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке