नैसर्गिक जलव्यवस्थापनाचे ब्रिटिशकालीन मॉडेल| पाणीसमृद्ध गाव |Natural Water source Management

Описание к видео नैसर्गिक जलव्यवस्थापनाचे ब्रिटिशकालीन मॉडेल| पाणीसमृद्ध गाव |Natural Water source Management

तळ कोकणातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या एका पाणी संपन्न गावाची ही गोष्ट..
ह्या गावात एकूण वर्षभर प्रवाही असणारे ५३नैसर्गिक झरे आहेत .. सह्याद्रीतील प्रत्येक गावात ऊगमा कडे असे झरे आढळतील..ह्या गावाने मात्र ह्या झऱ्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन करून ते पाणी घरा घरात पोचवले...ह्या गावात कधीच पाणी टंचाई होत नाही ..गावात अगदी क्वचित विहिरी सापडतील त्यामुळे भूजल सुद्धा भविष्यासाठी संवर्धित राहिले आहे...
आज आपण पाहतो की डोंगराळ गावांमध्ये धरणे बांधून लाखो करोडो रुपये खर्च करून लोकांचे विस्थापन करून पाणी अडवले जाते.. . पाण्याचे हे असे नियोजन कधीच शाश्वत नाही...

ब्रिटिश काळात तयार केलेले सावंतवाडी संस्थान परिसरातील तांबुळी ह्या गावाचे पाणी व्यवस्थापनाचे मॉडेल कोकणातील सह्याद्री पट्ट्यातील इतर गावांमध्ये सुद्धा उभे करून उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर केली जाऊ शकते...गरज आहे ती पर्यावरण पूरक विचारांची आणि इच्छाशक्तीची..

निसर्ग जीवनशैली ला अबाधित ठेवून शाश्वत विकासाचे स्वप्न पाहूया...कोकणचे कोकणपण जपुया ❤️🙏

...रान माणूस

Follow us on
Fʙ:   / konkaniranmanus  
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ:   / konkaniranmanus  
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
   / konkaniranmanus  

#watermanagement #sustainableliving #कोकण

Комментарии

Информация по комментариям в разработке