कोकणातील मंत्रमुग्ध करणाऱ्या आरत्या - २०२३

Описание к видео कोकणातील मंत्रमुग्ध करणाऱ्या आरत्या - २०२३

कोकणातील मंत्रमुग्ध करणाऱ्या आरत्या - २०२३
आरत्या आवडल्यास चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

वंदू देवाला गजानन सिंहासनी बैसले ओ ओ - २
भाद्रपदमासी शुद्ध चतुर्थी पुजती गण तुजला
पुजती गण तुजला ... गजानन सिंहासनी बैसले .. वंदू देवाला ...!!

लाडू मोदक नैवेद्याला दुर्वा वाहायला
दुर्वा वाहायला ... गजानन सिंहासनी बैसले ओ ओ.. वंदू देवाला ...!!

केशर कस्तुरी सर्वांगाला मुकुट शोभेला
मुकुट शोभेला ... गजानन सिंहासनी बैसले ओ ओ.. वंदू देवाला ...!!

भक्त हरी आठवितो रूप गातो तव लीला
गातो तव लीला ... गजानन सिंहासनी बैसले ओ ओ.. वंदू देवाला ...!!
_______________________________________

आरत ही तुजला गजानन आरत ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति पैंजण । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥
गंध पुष्प दीप धुप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥
भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥
________________________________________

गजवदना धावत ये माझ्या अंगणा - (२)
हाती घेऊनि पंचारती ओवाळितो तुला - (२)
गजवदना धावत ये माझ्या अंगणा

हाती घेऊनि फुलांच्या माळा वाहतो मी तुला - (२)
गजवदना धावत ये माझ्या अंगणा

हाती घेऊनि दुर्वांची वाहितो चरणावरी - (२)
गजवदना धावत ये माझ्या अंगणा

नैवद्य हा लाडू मोदकांचा लावितो तुला - (२)
गजवदना धावत ये माझ्या अंगणा

विघ्नविनाशक गणराया सांभाळावे आम्हा - (२)
गजवदना धावत ये माझ्या अंगणा

_______________________________________

आरत ही तुजला रे मोरया ... आरत ही तुजला ... ।।धृ।।

करीत असे मी बहू प्रेमाने ...
सुख देई मजला रे मोरया ... आरत ही तुजला ।।१।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी
जन पुजती तुजला रे मोरया .. आरत ही तुजला ।।२।।

रुणझुण पायी वाजती पैंजण
ध्वनी गगनी भरला रे मोरया .... आरत ही तुजला।।३।।

मोरेश्वर सूट वासुदेव कवी
गाई बाहुलीला रे मोरया ... आरत ही तुजला ।।४।।

Комментарии

Информация по комментариям в разработке