खालापूर-डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सचिनदादांच्या उपस्तिथीत शानदार सोहळा संपन्न

Описание к видео खालापूर-डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सचिनदादांच्या उपस्तिथीत शानदार सोहळा संपन्न

खालापूर-दुर्गुण बाजूला सारून सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून सुखी आयुष्य जगा -सचिनदादा धर्माधिकाऱ्यांचे निरुपम
हजारो शासकीय दाखल्यांचे वाटप-एक स्तुत्य उपक्रम , हजारो श्री सदस्यांची शिस्तबद्ध उपस्तीथी
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा अलिबाग यांच्या माध्यमाध्यमातून खालापूर तालुक्याच्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या हाळ गावाच्या हॉटेल यू के रिसॉर्ट्स येथे खालापूर तालुक्यातील लाभार्त्याना शासकीय दाखल्यांचे वाटप कार्यक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सचिनदादा धर्माधिकारी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपा सचिनदादा धर्माधिकारी या उभयतांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले ... यावेळी व्यासपीठावर खालापूर चे तहसीलदार इरेश चॅपलवार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,हाळ ग्रामपंचायत सरपंच सौ पवार , उपसरपंच अजीम कर्जीकर , सदस्य तर खालापूर नगरीचे नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगरध्यक्षा शिवणीताई जंगम , महिला बाळ कल्याण सभापती मंगलाताई चाळके आवर्जून उपस्तिथ होते ..
सचिनदादा धर्माधिकारी यांचे विचार ऐकण्यासाठी या सोहळ्याला खालापूर तालुक्याच्या सर्वच गावांमधील श्री सदस्य , सदस्यां हजारोंच्या संख्येने उपस्तिथ होत्या . दुपार पासून श्री सदस्य यांनी कार्यक्रम स्थळी येण्यास गर्दी केली होती . हॉटेल यु के रिसॉर्ट्स चे भव्य पटांगण श्री सदस्यांनी फुलून गेलेले होते ..
महाराष्ट्र भूषण स्वर्गय नानासाहेब धर्माधिकाऱ्यानी बैठकीच्या रूपातून सुरु केलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्ष झालंय , नानासाहेबांच्या नंतर अप्पासाहेब ,सचिनदादा तर संपूर्ण कुटुंबाने नानासाहेबांच्या नंतरही बैठकीच्या रूपातून राज्यात , देशात न्हवे तर परदेशातही आपली श्री सेवा भक्ती घराघरात पोहचवलीय
बैठकीच्या निरूपणातून मिळणाऱ्या अमृतातुन लाखो श्री सदस्यांचे जीवन आनंदी सुककर झालेय . प्रतिष्टानच्या माध्यमातून व्यसनमुक्ती , रुक्ष लागवड ,रोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबीर , बाळ संस्कार अश्या विविध सामाजिक क्षेत्रात निरंतर काम सुरु आहे . याच सामाजिक भावनेतून खालापूर मध्ये हजारोचनहाय संख्येने जात पाट धर्म पंथ न पाहता जेष्ठ नागरिक दाखल्यांचे , वय व अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले ..
यावेळी सचिनदादांनी आपल्या भाषणातून भाषणातून संपूर्ण महसूल यंत्रणेचे आभार व्यक्त केले . सचिनदादांनी आपल्या निरूपणातून उपस्तिथ हजारो सदस्यांना काम क्रोध , मद , मत्सर , लोभ, भीती, संशय,द्वेष , राग, अभिमान , वासना यावर बहुमूल्य उदाहरणासहित मार्गदर्शन करून जगण्याचा नवा मंत्र दिला . मानवी जीवन सुलभ सुखकर आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी त्यांनी गुरुमंत्राच दिला .मानवाच्या आरोग्यासारखे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मानवाने आपल्या अंतरंगातील अनेक दुर्गुण बाजूला सारून प्रत्येकाने जीवन जगत असताना आपल्यातील आंतरिक सद्ससविवेक जागरूक ठेवण्याचं आवाहन केले . सचिन दादांच्या या निरूपणने उपस्तिथ श्री सदस्य मंत्रमुग्ध झाले होते ..
सचिनदादांनी नेमकं काय निरूपणातून श्री सदस्यांना संदेश दिलाय पहा

Комментарии

Информация по комментариям в разработке