आडसाली उसाची लागवड करताना कोणती काळजी घ्याल- श्री. सुरेश कबाडे

Описание к видео आडसाली उसाची लागवड करताना कोणती काळजी घ्याल- श्री. सुरेश कबाडे

'गन्नामास्टर तंत्रज्ञान आपलं तंत्रज्ञान'

आडसाली लावण करतेवेळी कोणती काळजी घ्यावी?

आडसाली लावण करत असताना 10ते11 महिन्याचे शुद्ध ,निरोगी बियाणे वापरा.'शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी' बियाणे दर्जेदार वापरल्याने लावण व खोडवा पिकात वाढ मिळते.

तसेच बीजप्रक्रिया करून ऊसाची लावण करा. त्यासाठी20टक्के क्लोरो लिटर ला 2मिली, व बाविस्टीन लिटरला 1ग्रॅम यांचे एकत्रित द्रावण करून 15मिनिटे बियाणे बुडवून ठेवा. बीजप्रक्रिया केल्यामुळे कांडीकीड,खवलेकीड, बुरशीरोग यांचे नियंत्रण होते.

ऊसाची लावण करत असताना सरीतील अंतर 4.5 ते 5फूट व दोन डोळ्यातील अंतर 1.5 ते 2फूट(मार्किंग करून) ठेवा.
बेसल डोस एकरीं 2पोती dap, 1पोती पोटॅश सोबत खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एकरीं 8किलो फरटेरा टाका.
बेसल डोस देत असताना खते फेकून न देता मातीआड करून द्या.

पावसाळी दिवस असल्यामुळे लावण मध्यभागी न करता एका बगली करा.
पूर्व पश्चिम सरी असेल तर उत्तर बाजूच्या बगलेला व दक्षिण उत्तर सरी असेल तर पश्चिम बाजूच्या बगलेला लावण करा.कारण या दोन्ही बाजूला सूर्यप्रकाश जास्त मिळत असल्यामुळे लावण जलद उगवून येते.

पावसाळयात लावण करत असताना एकबगली लावण केलेल्या ऊसाच्या तुलनेत मध्य सेंटरला लावण केलेल्या ऊसाची जास्त पाणी साचून राहत असल्यामुळे कुचंबणा होत राहते. एकबगली केलेली लावण मध्य सेंटरला केलेल्या लावणीच्या तुलनेत कायम वापश्यावर राहते.पावसाळा सोडुन पूर्व, सुरू हंगामा मध्ये मध्य सेंटरला लावण केले तर चालते.
----------------------------------------------------------
कांडी लावण केल्यानंतर फवारणी व आळवणी शेड्युल खालील प्रमाणे

-★मास्टर किट वापरण्याची पद्धती★

★कांडी लावण केल्याच्या नंतर १०दिवसांनी पहिली आळवणी

_मास्टर लाईफ २५० ग्रा + मास्टर रुट ५०० मिली+युरिया ६ किलो २०० ते ४००लिटर पाणी
----------------------------------------------------------
★कांडी लागणी केल्याच्या २५ते३०दिवसानंतर
दुसरी आळवणी

मास्टर लाईफ २५० ग्रा + मास्टर रुट ५००मिली + युरिया ६किलो २००ते ४००लिटर पाणी
---------------------------------------------------------

★१ली फवारणी,लावणी नंतर३५ते४०दिवस
४५/६०लिटर पाणी
मास्टर बोनस१००मिली+युरीया १००ग्रॅम १५लिटर पाण्यामध्ये किंवा १३/०/४५:- ३/४ग्रॅम प्रति लिटर
----------------------------------------------------------

★२री फवारणी, लावणी नंतर४५ते५०दिवस
६०ते७५लिटर पाणी
मास्टर ग्रोथ२०मिली+२५०ग्रॅम मास्टर लाईफ
युरीया १२५ग्रॅम १५लिटर पाण्यामध्ये किंवा १३/०/४५:-४/५ग्रॅम प्रति लिटर
----------------------------------------------------------

★३री फवारणी,लावणी नंतर५५ते ६०दिवस
९०ते१०५लिटर पाणी
मास्टर ग्रोथ ३०मिली+मास्टर स्पीड २५ मिली २५०ग्रॅम मास्टर लाईफ+युरीया १५०ग्रॅम १५लिटर पाणी किंवा १३/०/४५:-५ते६ग्रॅम प्रति लिटर
----------------------------------------------------------
---------------------------------------------------------
शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.*
✍️प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
*मोबा:- 9403725999
कृपया फॉरवर्ड करताना मूळ नावासहित करावे

गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता

www.gannamaster.com

ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
http://bit.ly/3k3t75o

मास्टर ड्रीप (Master Drip)
http://bit.ly/3qbFsIq

मास्टर केन (Master Cane)
http://bit.ly/3nOy7vM

मास्टर रिकव्हर (Master Recover)
http://bit.ly/3knsiVp

भाजीपाला किट (Veg Kit)
http://bit.ly/3GMZ7Vb

कांदा किट (Onion Kit)
http://bit.ly/3EGwC9U

हळद किट (Turmeric Kit)
http://bit.ly/3k5btON

केळी किट (Banana Kit)
http://bit.ly/3nTcc6O

आले किट (Ginger Kit)
http://bit.ly/3GJHQMy

मास्टर सोया (Master Soya)
http://bit.ly/3EBJrly

मास्टर चना
http://bit.ly/3kAAcuq

कृषिरसायने (Krishirasayane)
http://bit.ly/3q7p4c2

Комментарии

Информация по комментариям в разработке