केवढा हो हरी | Kevdha ho Hari | Marathi devotional poem | मराठी मुक्तछंद काव्य

Описание к видео केवढा हो हरी | Kevdha ho Hari | Marathi devotional poem | मराठी मुक्तछंद काव्य

The poetess has expressed her spiritual feelings for the Universal God.
Lord Hari or Vitthal or Pandurang being the face for this God here.

#marathi #hari #vitthal #pandurang #ashadhiekadashispecial #kevdhahohari #marathikavita #marathipoem
केवढा हो हरी, केवढा हो
अणुपासुनी आकाशा एवढा हो ।।धृ ।।

हरी खाई हो काय खाई हो ?
दूध दही की तूप लोणी सायी हो
गोड धोड मिठाई की खमंग हो
हरीशी नावडे यातील काही हो
गर्व खाण्यास आवडे भारी हो आमचा भारी हो ।।१।।

हरी हसतो हो हरी हसतो हो
आम्हास देव आमचा का हसतो हो ?
जीवामध्ये त्यास ना पाहात आम्ही
दगडधोंड्यांमध्ये पाहतो हो त्यास पाहतो हो
म्हणूनी देव मूढतेला हसतो हो आमचा हसतो हो ।।२।।

हरी रडतो का हरी रडेल का ?
सर्व जगाचा नायक रडेल का हो रडेल का ?
मायपित्याच्या प्रेमासाठी रडतो हो
निष्पापांचे हाल पाहूनी रडतो हो
माणुसकीशून्य माणसांना पाहता रडतो हो ।।३।।

हरी चालतो की चालवितो ?
हरी नाचतो की नाचवितो ?
झोपतो की झोपवितो ?
जागतो की जागवितो ?
काहीच यातील न करता
हरी सर्व करतो माझे हो ।।४।।

मम श्वासातुनी चराचरातुनी
हरी भरला हो हरी उरला हो
अणुरेणूतुनी कणाकणातुनी भरून हरी उरला हो
दिसत नसता ही हरी जाणवे हो
विश्वनागाच्या वेढ्यातील केवडा हो ।।५।।

केवढा हो हरी.....

।। राम कृष्ण हरी ।।

Комментарии

Информация по комментариям в разработке