झणझणीत खानदेशी शेव भाजी ...

Описание к видео झणझणीत खानदेशी शेव भाजी ...

घटक
पाऊण तास
३-४ जणांसाठी
मध्यम आकाराची जाड लाल शेव
3 टोमॅटो
2 कांदे
खोबरे, लसूण, कांदा ह्याचे वाटप
लाल तिखट
कोथिंबीर
हळद
कसुरी मेथी
जीरे
लिंबू
चवीनुसार मीठ
कुकिंग सूचना
1
सर्व प्रथम सुकं खोबरे, कांदा, लसूण पाकळ्या, आलं हे चांगले तेलात भाजून ह्या चे वाटप बनवून घ्या.


2
आता गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे, कढीपत्ता, हिंग ह्यांची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेलात लालसर परतवून वरील वाटप घालून तेलात चांगले परतवून घ्या. आता वरून हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घालून वाटप आला चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.


3
आता त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून त्याला एक दोन उकळी येऊ द्या.

4
गॅस बंद करून वरून जाड लाल शेव घालून थोडी तररी शेव मध्ये मुरली की मिनीटभरात सव्हऀ फोटो
5
गरमागरम झणझणीत खान्देशी शेव भाजी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लिंबू पिळून पावासोबत सव्हऀ करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке